Rahul Solapurkar  Saam tv
मुंबई/पुणे

Rahul Solapurkar : आधी बरळले, आता नरमले; शिवरायांवरील वक्तव्यावर राहुल सोलापूरकरांची जाहीर माफी

Rahul Solapurkar latest News : शिवरायांवरील वक्तव्यावर राहुल सोलापूरकरांनी जाहीर माफी मागितली आहे. फेसबुक व्हिडिओ शेअर करत राहु सोलापूरकरांनी माफी मागितली आहे

Vishal Gangurde

पुणे : ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सोलापूरकरांच्या शिवरायांवरील वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या वक्तव्यावरून त्यांच्यावर समाजातील चौफेर बाजूंनी टीका झाली. शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून आता अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली आहे.

ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, यासाठी शिवप्रेमींनी त्यांच्या घराबाहेर निदर्शने केली. पुढे वरिष्ठ पोलिसांच्या आदेशाने हे आंदोलन मागे घेण्यात आलं. कोथरूडमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं. शिवप्रेमींच्या आंदोलनानंतर राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितली. राहुल सोलापूरकर यांनी फेसबुक व्हिडिओ शेअर करत माफी मागितली.

राहुल सोलापूरकर यांनी जाहीर मुलाखतीत बोलताना छत्रपती महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका औरंगजेबाच्या लोकांना लाच देऊन करून घेतल्याचा दावा सोलापूरकरांनी केला होता.

सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते?

सोलापूरकरांनी हिरकणीचं अस्तित्व नाकारलं. सोलापूरकर म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावं, यासाठी हिरकणीची कथा रचली गेली. . गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगतात. मात्र हिरकणी घडलेलीच नाही. असा इतिहासाच नसून पण लिहिलं गेलं आहे'.

सोलापूरकरांनी मागितली जाहीर माफी

राहुल सोलापूरकर म्हणाले, 'दीड महिन्यांपूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना इतिहास आणि रंजक गोष्टीवर भाष्य केलं. याविषयी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका या विषयावर बोललो. बिकानेरच्या राजवाड्यातील, राजस्थानमधील कागदपत्रे, पारसी, उर्दू , औरंगाजेबच्या जवळच्या लोकांच्या गोष्टी वाचायला मिळाल्या. महाराजांनी तेव्हा रत्ने, पैसे देऊन तेथील लोकांना आपल्या बाजूला वळवून घेतलं. त्यानंतर स्वत:ची सुटका करून घेतली. हा विषय सांगताना लाच शब्द वापरला'.

'मी शाहू महाराजांची भूमिका अत्यंत व्यवस्थित साकारली होती. सर्व इतिहास अभ्यास वाचून अभिनय केला होता. छत्रपती शिवरायांचा अपमान करायचं माझ्या मनात येऊ शकत नाही. त्याचा विचार होऊ शकत नाही. कोणीतरी व्हिडिओतून भाग काढला. माझा नखभर देखील अपमान करण्याचा हेतू नाही. लाच शब्दामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. त्यांची मी माफी मागतो, असे सोलापूरकर पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT