ABVP Congress clash saam tv
मुंबई/पुणे

ABVP Congress clash: राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी COEPमध्ये राडा; अभाविपच्या तक्रारीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुण्यातील COEP महाविद्यालयातील वादानंतर अभाविपच्या तक्रारीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल. हॉस्टेलमधील कथित व्हिडीओ स्टेटमेंट, मारहाणीचे आरोप आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादाची ‘साम टीव्ही’ची एक्सक्लुझिव्ह माहिती जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

पुण्यातील COEP महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि काँग्रेसच्या युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभाविपच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

COEP हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून तिच्याकडून व्हिडीओ स्टेटमेंट घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात विचारपूस आणि चर्चा करण्यासाठी अभाविपचे काही कार्यकर्ते COEP हॉस्टेलमध्ये गेले होते. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 115(2), 189(1), 189(2), 191(2), 351(1), 352 तसंच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(3) आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.

राहुल गांधी यांचा पुणे दौरा

दरम्यान, पुण्यात आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर COEPमध्ये झालेल्या या वादामुळे राजकीय वातावरण तापलंय. काही मुलींना कॉलेजमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप NSUIकडून करण्यात आला. या प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी दाखल होत, राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा कट असल्याचा आरोप केला.

मात्रअभाविपने हे आरोप फेटाळून लावत NSUIच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रत्यारोप केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; राहुरी तहसील कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

पुण्यातील १२ दिवसांचा दारूबंदी आदेश रद्द; आता फक्त याच दिवशी ड्राय डे, हायकोर्टानंही कडक शब्दांत ओढले ताशेरे

Curly Hair Care Tips: कर्ली केस फ्रिझी होऊ नयेत म्हणून करा 'या' ७ गोष्टी; कर्ल्स दिसतील परफेक्ट आणि सुंदर

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी! १८ हजारांचा बेसिक पगार थेट ६९ हजार रुपये होणार? बेसिक सॅलरीचे 'हे' गणित पाहाच

PF Withdrawal Rule: आपत्कालीन परिस्थितीत PF मधून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या 9 नविन नियम

SCROLL FOR NEXT