Pune Crime News SAAM TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: प्रॉपर्टी खाली करा नाही तर मारून टाकू, पुण्यातील प्रसिद्ध 'वैशाली' हॉटेलमध्ये टोळीचा राडा

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Vaishali Hotel Workers Beaten Up By Gang: पुण्यातील प्रसिद्ध "वैशाली" हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रॉपर्टी खाली करा नाही तर मारून टाकू अशी धमकी देत एफसी रोडवर असलेल्या प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये टोळक्याने राडा केला.

या घटनेनंतर हॉटेल मालक निकिती शेट्टी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी इरफान शेख, सुशील सांडभोर, विश्वजित जाधव यासह इतर ८ ते ९ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आरोपी इरफान अनिस शेख याने विश्वजीत जाधवच्या सांगण्यावरून फिर्यादीच्या मालकीच्या वैशाली हॉटेलचे समोरील दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. (Marathi Tajya Batmya)

यानंतर इरफान अनिस शेखसोबत असलेले त्याचे साधीदार सुशिल सांडभोर, चौधरी व इतर ०८ ते १० जणांनी मिळून हॉटेलच्या कामगारांना मारहाण केली. तसेच त्यांना एका कोपऱ्यात बसवून त्या ठिकाणी लावलेले नोटीस बोर्ड फाडले, हॉटेलमध्ये असलेले क्यूआरकोड तोडून टाकले आणि सीसीटीव्हीचे वायर उखडून टाकले. (Latest Political News)

एवढ्यावरच न थांबता आरोपींनी हॉटेल कामगारांना "प्रॉपटी खाली करा नाही तर जीवानीशी जाल" धमकी दिली, तेथून निघुन गेले. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT