ajit pawar  Saam Tv
मुंबई/पुणे

ZP Election Result : पुणे जिल्हा परिषदेचा 'दादा' राष्ट्रवादीच, वाचा आतापर्यंतच्या विजयी उमेदवाराची यादी

Pune Zilla Parishad Election Result : पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास एकाहाती विजय मिळवल्याचे चित्र आहे. भाजप, शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय.

Namdeo Kumbhar

Pune Zilla Parishad Election Result Winner List in Marathi : पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती वर्चस्व मिळवले आहे. पुण्यात आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. इंदापूर आणि बारामती येथील निकाल अद्याप शिल्लक आहेत. पण त्याआधी इतर गटातून आलेल्या कलांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकहाती वर्चवस्व मिळवलेय. मावळ, जुन्नरसह आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली.

पुणे जिल्हा परिषदेत ७३ जागांसाठी निवडणूक झाली. त्यामधील ४० जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपच्या पदरी मात्र निराश पडली आहे. भाजप ६, शिवसेना ३, शरद पवार गट १, ठारे गट २ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला अद्याप एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत २७ जागांवर विजय मिळवलाय.

पुणे जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी..

१ ) जुन्नर

डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी)

ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी)

बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी)

आळे : मंगेश काकडे (शिवसेना)

राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना - शिंदे गट)

सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट )

बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी)

नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना)

२ ) आंबेगाव

पारगाव तर्फे अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी)

कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार)

शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी)

अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी)

घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना)

३ ) शिरूर

कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप)

न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी)

रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप)

मांडवगण फराटा: सुजाता पवार

४ ) खेड

नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी)

कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट )

पाईट सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)

५ ) मावळ

टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)

इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)

खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)

कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)

सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)

६ ) मुळशी

पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना उबाठा)

७ ) हवेली

कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी)

पेरणे: किरण साकोरे (भाजप)

८ ) दौंड

खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी)

वरवंड : गायत्री खळदकर

बोरी पार्धी : तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी)

९ ) पुरंदरे

गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी)

बेलसर: अजय इंगळे (भाजप)

वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप)

निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी)

१० ) वेल्हे

विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी)

वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी)

११ ) भोर

कामथडी- भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)

भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप)

१२ ) बारामती

सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी)

गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी)

१३ इंदापूर

भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी)

निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Refund: ITR Refund अडकला? ई-व्हेरिफिकेशन उशिरा झाले तरी मिळणार परतावा; ITAT चा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: ठाण्यात झाडाची फांदी कोसळल्याने व्यक्ती गंभीर

Mumbai-Goa Highway: पावसाचा हाहाकार! मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, कशेडी अन् वरंधा घाटात दरड कोसळली

Crime news: ऑफिसची पार्टी संपली, पती न्यायला आला अन्...! लग्नाच्या २ महिन्यातच नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

वजन कमी करण्यासाठी रोज प्या हे 5 हर्बल टी, 15 दिवसांत दिसेल फरक

SCROLL FOR NEXT