Pune Zika Virus Update  Saam TV
मुंबई/पुणे

Zika Virus in Pune : चिंता वाढली! पुण्यात झिका रुग्णाची संख्या पोहोचली ६ वर; २ गरोदर महिलांनाही लागण

Zika Virus cases found in pune : पुण्यात झिका विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. यामुळे रुग्णाची संख्या ६ वर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये २ गरोदर महिलांचीही समावेश आहे. त्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रातील पुण्यात झिका विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. यामुळे शहरात रुग्णाची संख्या सहा वर पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये २ गरोदर महिलांचा समावेश आहे. पुण्यातील झिका विषाणूची संख्या ६ वर पोहोचल्यानंतर नागरिकांची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे या भागात २८ वर्षीय महिलेला झिका विषाणूची लागण झाली आहे. या महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आली आहे.

तसेच १२ आठवड्याआधी एका गरोदर महिलेला झिका विषाणूची लागण झाली होती. सध्या या दोन्ही गरोदर महिलांची प्रकृती स्थिर आहे. गरोदर महिलांना झिका विषाणूची लागण झाल्याने भ्रूणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुलीसहित डॉक्टरला झाली लागण

पुण्यातील झिका विषाणूचा पहिला रुग्ण एरंडवणे परिसरात आढळला. या रुग्णाला ४६ वर्षीय डॉक्टरला झिका विषाणूची लागण झाली होती. तसेच या डॉक्टरच्या १५ वर्षीय मुलीलाही झिका विषाणूची लागण झाली होती. तर मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरातही २ रुग्ण आढळले होते. एका ४७ वर्षीय महिलेला लागण झाली होती. तर २२ वर्षीय व्यक्तीला झिकाची लागण झाली होती.

काय आहे झिका विषाणू?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, झिका विषाणू हा एडीज नावाचा डास चावल्याने पसरतो. एडीस डास चावल्याने डेंगू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप या आजारांना सामोरे जावे लागते. हे तिन्ही आजारांमध्ये साम्य आहे. तिन्ही आजार पश्चिम, मध्य आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया या भागात झाली. झिका विषाणू गरोदर महिलांना झाल्यानंतर त्यांच्या गर्भातील बाळालाही होतो.

काय आहेत झिका विषाणूची लक्षणे?

झिका विषाणूची लक्षणे सामान्य आहेत. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला डोकेदुखीची लक्षणे जाणवतात. शरीराचे स्नायू जड होतात. स्नायू दुखतात. शरीरारवर लाल रंगाच्या पुरळ उठण्यास सुरुवात होते. हिरड्याही दुखू लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण अपघात, भरधाव ट्रकची समोरून धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू

Glass Vs Plastic Tiffin Box: टिफिनसाठी प्लास्टिकचे की काचेचे कोणते डबे वापरावे?

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT