Pune Gang War Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Gang War: पुण्याचं होतंय 'गँग्ज ऑफ वासेपूर'; गोळ्या झाडून मेला नाही म्हणून कोयत्यानं वार

Pune Gang War: पुण्यातील गँगवॉरची.... दिवसाढवळ्या कोर्टाबाहेर एका तरुणावर गोळीबार आणि कोयत्यानं हल्ला झालाय...पुणे पोलिसांसमोर हल्ला करण्यामागचं कारण काय? या हल्ल्यामागची इनसाईड स्टोरी काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

Pune Gang War: काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत...पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरील... चार- पाच जणांच्या टोळक्याने मंदार किवळे नावाच्या तरुणावर आधी फायरिंग केली...मात्र नेम चुकल्यानं या गँगनं पुढचा मागचा विचार न करता... कोर्टाबाहेरच दिवसाढवळ्या किवळेवर कोयत्यानं सपासप वार केले...आणि संपूर्ण पुण्यात एकच खळबळ माजली....कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं? पाहूयात...

पुण्यात कोर्टाबाहेर काय घडलं?

4 ते 5 हल्लेखोर कोयता घेऊन शिवाजीनगर कोर्टाबाहेर आले. त्या 6 जणांच्या टोळक्यानं आधी किवळे नावाच्या तरुणावर अंधाधुंद गोळीबार केला... मात्र गोळीचा नेम चुकल्याने त्यांनी कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली.. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात किवळे याचे दोन्ही हात जवळपास मनगटापासून वेगळे झाले. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट क्रमांक 4 जवळ रहदारीच्या रस्त्यावर हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर दोन्ही पिस्तूल फेकून आरोपी बाईकवरून पसार झाले...विशेष म्हणजे पुणे पोलिसांच्या समोरच हा थरार घडला

या हल्ल्यामागची इनसाईड स्टोरी आता समोर आलीय...ज्या मंदार किवळेवर हल्ला झाला तो देखील जमीन आणि आर्थिक वादातून झालेल्या कात्रजमधल्या हत्या प्रकरणाचा आरोपी आहे. ..त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

दोन दिवसांपूर्वीच शिवाजीनगर न्यायालयाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतरही न्यायालय परिसरात गुंड पिस्तूल आणि कोयते घेऊन येतात आणि भरदिवसा जीवघेणा हल्ला करून पसार होतात, हे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र, गुन्हेगारांच्या टोळ्या आता पोलिसांच्या नाकाखाली थेट कोर्टाच्या परिसरात येवून जीव घेऊ लागल्यानं पुण्याचं वासेपूर होत चाललंय. पुणे पालिका आयुक्तांनी पुण्यातलं अतिक्रमण आणि फ्लेक्स साफ केले मात्र पोलीस आयुक्त पुण्यातली गुन्हेगारी कधी साफ करणार? असा गंभीर प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय.

सचिन जाधवसह अक्षय बडवे, साम टिव्ही, पुणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अतिक्रमण हटावनंतर पुण्यात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम; मनपाकडून पुणे विद्रुपीकरणाचा पुरस्कार जाहीर

दारूड्यांसाठी सरकारची अनोखी योजना; दारू पिण्याआधी होणार मेडिकल टेस्ट

Vaibhav Suryavanshi: क्रिकेटचं ऐतिहासिक 'वैभव' परतलं; वैभव सूर्यवंशीच्या 52 चेंडूत 204 धावा

Thursday Horoscope: आज 3 राशींच्या आयुष्यात घडणार आनंददायी बदल, तर काहींना कामाच्या ठिकाणी नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार

हृदयविकार, BP, डाय़बेटीजची बनावट औषधं; FDA कडून बनावट कारखान्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT