Pune Water Cut News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणत्या भागांचा समावेश?

Pune Water Cut News : पुणे महानगरपालिकेद्वारे शहरातील मुख्य जलवाहिनीचे अत्यावश्यक काम केले जाणार आहे. यासाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तेव्हा पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Yash Shirke

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे शहरात गुरुवारी (२३ जानेवारी) काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर शुक्रवारी (२४ जानेवारी) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. जलवाहिनीने अत्यावश्यक काम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेद्वारे शहरात जलवाहिनीचे काम केले जाणार आहे. तळजाई टाकी येथील मुख्य व्हॉल्वचे आणि मुख्य जलवाहिनीचे काम करण्यासाठी कात्रज परिसरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची विनंती पालिका प्रशासनाने केली आहे.

या संदर्भात महानगरपालिकेने प्रसिद्ध पत्रक सादर केले आहे. यामध्ये २३ जानेवारीला कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी सोसायटी, जिजामाता भुयारी मार्ग, धनकवडी, स. नं. ३,४,७,८ तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी या भागांमध्ये पाणी येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे.

उद्यानंतर शुक्रवारी २४ जानेवारीला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पत्रकामध्ये म्हटले आहे. या सर्व गोष्टींची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाणी साठवून ठेवावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने कात्रज परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT