pune news  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Shocking : पुण्यात आणखी एक 'वैष्णवी'; हुंड्यासाठी जीवघेणा छळ, २३ वर्षीय विविहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य

Pune Shocking News : पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना आणखी भयंकर घटना घडली. एका नवविवाहितेने आयुष्य संपवलं.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात हुंडाबळीच्या घटना सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असताना आणखी एक घटना घडली आहे. पुण्यात एका २३ वर्षीय विविहित महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

पुण्याच्या वाघोली परिसरात विवाहित महिलेने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. पुण्यात या महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन विवाहितेने आत्महत्या केली. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला वैतागून नवविवाहितेने आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक केली आहे. स्वाती सुरज पाठक (वय २३) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

२६ वर्षीय पती सुरज पाठक याला वाघोली पोलिसांनी अटक केली. ४५ वर्षीय सासू सुनिता पाठक, दीर निरज पाठक (वय २३), मामा अरुण उपाध्याय (वय ४५) आणि मामा अरविंद उपाध्याय यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती आणि सूरज यांचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नात ५ लाख रुपये आणि सोन्याचे दागिन्याची मागणी करुन लग्नात १ लाख आणि ७ तोळे सोन्याचा हुंडा घेतला. लग्नानंतर मागणी प्रमाणे हुंडा दिला नसल्याने स्वातीला मारहाण करुन मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली होती. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पती आणि सासूने गहाण ठेवून पैसे घेतले.

सोने सोडवून आणण्यासाठी तिच्याकडे ३ ते ४ लाखा रुपयांची मागणी केली. तेव्हा स्वातीच्या वडिलांनी ३ लाख रुपये दिले. त्यानंतरही स्वाती यांना घरगुती कारणावरुन वादविाद करुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून ७ जून रोजी स्वातीने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुसर्‍या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत सोयाबीन वडी; प्रत्येकाला आवडेल चव

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल-शहनाज गिल रिलेशनशिपमध्ये? बर्थडे पार्टीनंतरची 'ती' मूव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

SCROLL FOR NEXT