MLC Election update Saam tv
मुंबई/पुणे

Pune MLC Election : मोठी बातमी! पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, सुनेत्रा पवारांनी या नेत्यावर दाखवला विश्वास

Vikram Kakade, Pune MLC Election : पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या चर्चेनंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून पुण्यात पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत रंगणार आहे.

Akshay Badve

Vikram Kakade Pune MLC candidate announcement : पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीकडून अखेर उमेदवारावर शिक्कामोर्तब झालेय. विक्रम काकडे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आज दुपारी ते उमेदवारी अर्ज भरणार आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पुण्याची जागा आली आहे. सुनेत्रा पवार यांनी २ दिवसांपासून विधान परिषदेसाठी इच्छूक उमेदवारांवर चर्चा केली, त्यानंतर विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

विक्रम काकडे दुपारी १२ वाजता विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवर आज शिक्कामोर्तब झालं. दुपारी १२ वाजता विक्रम काकडे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

महायुतीकडून पुण्याची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. तर मविआकडून ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे. सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT