Pune vehicle vandalism Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच, पुन्हा ६० ते ७० गाड्या फोडल्या; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Vehicle Vandalism: पुण्यामध्ये कोयता गँगपाठोपाठ आता तोडफोड करणाऱ्या गँगची देखील दहशत पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील विविध भागांमध्ये वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत. बिबवेवाडीमध्ये टोळक्यांनी पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड सुरू आहे. परिसरात उभ्या असणाऱ्या महागड्या वाहनांची तोडफोड केली जात आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुण्यातील येरवडा, बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. बिबवेवाडीमध्ये पुन्हा ६० ते ७० वाहनांची तोडफोड करण्यात आली. हातामध्ये कोयता घेऊन टोळक्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

बिबवेवाडीत ६० ते ७० गाड्या फोडल्या -

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बिबवेवाडी परिसरात वाहनांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे. रिक्षा, चार चाकी, दुचाकी अशा ६० ते ७० गाड्या फोडण्यात आल्या आहेत. हातात कोयते घेऊन मध्यरात्री ३ वाजता ३ तरुणांनी वाहनांची तोडफोड केल्याची माहिती नागरिकांनी दिली. पोलिस सकाळी या तरुणांना अटक करतात संध्याकाळी सोडून देतात, असा संताप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह -

बिबवेवाडीमध्ये घरासमोर आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य करत टोळक्यांनी तोडफोड केली. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ३ जणांची ओळख पटवली असून ते या तरुणांचा शोध घेत आहेत. वाहन तोडफोडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

येरवडा वाहन तोडफोड प्रकरणी तिघे अटकेत -

पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी ३ जणांना अटक केली. येरवडा परिसरातूनच अवघ्या सहा तासांत आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर अशी आरोपींची नावं आहे. पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे.

कोंढव्यात दुकानामध्ये घुसून कोयत्याने तोडफोड -

तर दुसरीकडे, पुण्यात कोयता गँगची देखील दहशत पाहायला मिळत आहे. भर दिवसा कोयत्याने दुकानात घुसून हल्ला करण्यात आला. अगदी आरामात दुकानामध्ये आले आणि कोयत्याने हल्ला करून आरोपी निघून गेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दोन तरुण एका दुकानात घुसतात हल्ला करतात आणि हल्ला करून निघून जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. कोंढवा परिसरात ही घटना घडली असून पोलिस सध्या तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT