Nilesh Chavan Arrest Video Saam Tv News
मुंबई/पुणे

Nilesh Chavan Arrest : अटकेच्या भीतीनं पुण्यातून पसार, ९ दिवस पोलिसांना चकवा, ४ राज्यांतून प्रवास; निलेश नेपाळला कसा पोहोचला?

Nilesh Chavan Arrest Video : वैष्णवी हगवणेनं १६ मे रोजी आत्महत्या केली. सासरच्यांच्या छळाला कंटाळून तिनं आयुष्य संपवलं. यानंतर वैष्णवीच्या पती, सासू, नणंदेला अटक करण्यात आली.

Prashant Patil

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना एक मोठे यश आलं आहे. बंदुकीच्या धाकावर वैष्णवीच्या १० महिन्याचं बाळ स्वतःकडे ठेवणाऱ्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी अखेर नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा अटकेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

निलेश चव्हाण हा मागील १० ते १२ दिवसापासून फरार होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल केला होता. निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांची पाच पथकं त्याच्या मागावर होती. तो परराज्यात निघून गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. अखेर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून निलेश चव्हाण याला ताब्यात घेतलं आहे. उद्या पिंपरी चिंचवड शहर पोलीस निलेश चव्हाण याला कोर्टासमोर सादर करण्याची शक्यता आहे.

वैष्णवी हगवणेनं १६ मे रोजी आत्महत्या केली. सासरच्यांच्या छळाला कंटाळून तिनं आयुष्य संपवलं. यानंतर वैष्णवीच्या पती, सासू, नणंदेला अटक करण्यात आली. वैष्णवीचं बाळ हगवणे कुटुंबानं निलेश चव्हाणकडे दिलं होतं. याची माहिती मिळताच वैष्णवीचे काका आणि मामा चव्हाणच्या घरी गेले. त्यांनी बाळ ताब्यात देण्याची मागणी केली. तेव्हा निलेश चव्हाणनं त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावलं. या प्रकरणी हगवणे कुटुंबानं चव्हाण विरोधात पोलीस तक्रार नोंदवली. अटकेची कुणकुण लागताच निलेश चव्हाण फरार झाला. त्यानं पुण्यातून कारमार्गे दिल्ली गाठली. तिथून तो राजस्थानला गेला. मग त्यानं मध्य प्रदेश गाठलं. यानंतर तो उत्तर प्रदेशमार्गे नेपाळला गेला. निलेश चव्हाण देशाबाहेर जाऊ नये यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लूकआऊट नोटिस जारी केली होती. पण तरीही चव्हाण आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यात यशस्वी ठरला. नेपाळच्या भैरहवामधील एका लॉजमध्ये त्याचा मुक्काम होता.

पिंपरी-चिंचवड पोलिसांची ४ आणि पुणे पोलिसांची ३ अशी एकूण ७ पथकं निलेश चव्हाणच्या मागावर होती. पण तरीही त्यानं ९ दिवस पोलिसांना चकवा दिला. निलेश चव्हाण सातत्यानं त्याचं लोकेशन बदलत असल्यानं त्याचा माग काढणं पोलिसांना अवघड जात होतं. निलेश चव्हाण नेपाळला गेल्याची कुणकुण पोलिसांना लागली. यानंतर खबऱ्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चव्हाणला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT