Pune University Saam tv
मुंबई/पुणे

Pune University Latest News: ललित कला केंद्र प्रमुख यांच्यासह ६ जणांना अटक; भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडलं

Ramleela Play Controversy in pune : ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज भाजप कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राचं कार्यालय फोडलं आहे.

Vishal Gangurde

Pune University Ramleela Play Controversy

: सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या अंगणमंचावर रामलीला विषयावरील नाटकावरून मोठा गदरोळ निर्माण झाला आहे. या नाटकातील कलाकरांवर टीका केली जात आहे. याचदम्यान, ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज भाजप कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राचं कार्यालय फोडलं आहे. (Latest Marathi News)

सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाटक प्रकरणी ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह सहा जणांना कालच्या नाटकाबाबत अटक करण्यात आली आहे. रामलीलेवरील या नाटकातील संवादांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आक्षेप घेण्यात आला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडलं होतं.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नाटकाशी संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच नाटकाचे दिग्दर्शक, काम करणारे कलावंत यांच्यासह ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रविण भोळे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.

ललित केंद्राच्या प्रमुखांसह विद्यार्थ्यांना जामीन मंजूर

सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाटक प्रकरणात आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. या प्रकरणी ललित केंद्राचे प्रा. प्रवीण भोळे आणि विदयार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.   (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे नेमकं प्रकरण?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित केंद्रात विद्यार्थ्यांकडून काल सायंकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाचं सादरीकरण होतं.

'जब वी मेट' नावाच्या नाटकात कालाकारांचं वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, हे नाटकातील संवादांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत नाटकाचा प्रयोग उधळून लावला. तसेच यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

Wednesday Horoscope : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, वाणीवर लक्ष असू द्या; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

SCROLL FOR NEXT