pune university Saam Tv
मुंबई/पुणे

Pune University Exam: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइनच होणार

डॉ. नितीन करमळकर (Nitin Karmalkar) यांनी नियुक्‍त केलेल्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आणि अन्य वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची शिफारस केली होती.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) परीक्षा (Exam)ऑनलाइन पद्धतीने होणार की ऑफलाइन पद्धतीने होणार हा संभ्रम आता दूर झाला आहे. सोमवारी (३१ जानेवारी) झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे महाविद्यालये बंद करण्यात आली होती त्यानंतर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्या परिषदेत घेण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर (Nitin Karmalkar) यांनी नियुक्‍त केलेल्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आणि अन्य वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची शिफारस केली होती.

परंतु गेल्या काही दिवसांत पुन्हा ऑफलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयावर चर्चा सुरु होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत परीक्षांबाबत चर्चा झाली आणि त्यानंतर विद्या परिषदेने ऑनलाइन परीक्षांना मान्यता दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

SCROLL FOR NEXT