Auto Rickshaw Saam
मुंबई/पुणे

Auto Rickshaw Uniform: पुण्यातील रिक्षा चालकांचा युनिफॉर्म ठरला! गणवेश नसेल तर थेट कारवाई

Pune Auto Rickshaw Driver Uniform Color: महाराष्ट्रातील ऑटो आणि टॅक्सी चालकांना गणवेश घालणे बंधनकारक करण्यात आले असून त्याचे पालन न केल्यास आता दंडात्मक कारवाई केली

Bharat Jadhav

Auto Rickshaw Uniform : ऐका रिक्षाचालकांनो ऐका, चालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुण्यातील चालकांसाठी युनिफॉर्म अनिवार्य करण्यात आलाय. ज्या रिक्षाचालकांकडे गणवेश नसेल तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मार्गावर सेवा पुरवताना रिक्षाचालकांना आता पांढरा शर्ट आणि खाकी पँट, असा गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहे.

तसेच यासोबत ओळखपत्र प्रदर्शित करणे देखील बंधनकारक असणार आहे. चालकाकडे युनिफार्म नसेल तर पुणे आरटीओकडून कडक कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भातील पत्र नुकतेच पुणे आरटीओकडून काढण्यात आलंय. मोटार वाहन कायद्यातील विविध नियमांचा भंग वाहनचालकांकडून केला जातो.

त्याअनुषंगाने आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत सातत्याने कारवाई केली जात असते. आता फक्त रिक्षाचालकांचा गणवेश, ओळखपत्र आणि त्यांची वैध कागदपत्रांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्याकरिता विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांनी या नियमांचे पालन करावे, अन्यथा या विशेष मोहिमेत नियमभंग केल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असल्याचेही या पत्रात म्हटलंय.

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून गणवेशाबाबत निर्देश देण्यात आलेत. लवकरच शहरात यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू होणार आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार ऑटो-रिक्शा व टॅक्सी चालकांना वाहन चालवताना गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन होत असेल पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC Hall Ticket: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, हॉल तिकिटाबाबत मोठी अपडेट समोर

धक्कादायक! भाजप नेता स्टेजवर चढताना धाडकन तोंडावर आपटला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Somatic Yoga Benefits: पाठदुखी आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय; घरच्या घरी करा सोमॅटिक योगा, ही आहे सोपी पद्धत

Jalna Election: जालन्यात आचारसंहितेचा भंग, टोलनाक्यावर ९८ लाखांची रोकड जप्त, बॅगा भरून पैसे अन्...

SCROLL FOR NEXT