Pune: ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; दोन्ही वाहने दरीत कोसळली  सागर आव्हाड
मुंबई/पुणे

Pune: ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; दोन्ही वाहने दरीत कोसळली

वरंधा घाटात अपघातात लहान मुलीसह तिघेजण जखमी

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील महाडच्या बाजूला वरंध गावाजवळील नागमोड्या वळणावर ट्रकची पीकअप जीपला धडक झाली आहे. या अपघातात 6 वर्षाच्या लहान मुलीसह तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वरंध गावच्या ग्रामस्थांनी गाड्यांमध्ये अडकलेल्या बाहेर काढले आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेले तिघेही भोरचे Bhor आहेत. जखमींना महाडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एक पीकअक जीप महाडवरून भोरला येत होती. त्यावेळी वरंध गावाजवळील नागमोडी वळणावर भोर बाजूकडून आलेला ट्रक (क्रमांक एम एच 12 एफ सी 8199) हा वंरधा घाटतून महाडच्या बाजूला घाट उतरत होता. त्याचवेळेस ट्रकने समोरून येत जीपला धडक दिली. यामुळे दोन्हीही वाहने खोल दरीत कोसळली आहेत. अपघाताचा आवाज आल्यामुळे वरंध गावातील ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये पीकअप जीपमधील चालक आणि त्याची 6 वर्षांची मुलगी व ट्रकचालक या तीघांनाही ग्रामस्थांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले आहे .

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

How To Remove Negativity: घरात दारिद्र्य आणतात या ४ गोष्टी, आजच घराबाहेर काढा

Maharashtra Cabinet : सांगली, लातूर अन् पुण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, निवडणुकीआधी कोट्यवधी रूपये मंजूर

World Stroke Day: ब्रेन स्ट्रोक येण्यापूर्वी शरीर तुम्हाला देतं 'हे' संकेत; वेळीच लक्षणं ओळखून वाचवा जीव

Phaltan Doctor Case: PSI गोपाल बदनेने मोबाइल कुठे लपवून ठेवला? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT