Pune Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

Shravan Somvar: पुण्यातील खेडजवळ भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. ३५ भाविकांना घेऊन जाणारं वाहन १०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर ३० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

रोहिदास गाडगे, पुणे

पुण्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला घातला. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. भाविकांनी खचाखच भरलेले वाहन दरीत कोसळले. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवार निमित्ताने हे भाविक कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. नागमोडी वळणावर घाट चढताना वाहन रिटर्न आल्याने महिला भाविकांची पिकअप जिप १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिस जखमी झालेल्या महिला भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत आहेत. १० रुग्णवाहिकांमधून जखमी भाविकांना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे. जखमी भाविकांना खासगी रुग्णालय आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT