Pune Traffic  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Pune Traffic Changes: पुण्यात वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक मार्गात हे बदल करण्यात आले आहेत. पुणेकरांनी कुठून कसा करावा प्रवास हे घ्या जाणून....

Priya More

Summary -

  • पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत

  • महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद राहील

  • फरासखाना आणि येरवडा परिसरात वाहतूक वळविण्यात आली

  • शिवमंदिर परिसरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने घेतला निर्णय

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील फरासखाना आणि येरवडा परिसरातील शिवमंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक शाखेने वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आज विविध मार्गांवर तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

फरासखाना वाहतूक विभागाअंतर्गत पुण्‍येश्‍वर रस्‍ता आणि अगरवाल रस्‍त्‍यावरी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्‍यात येणार आहे. यावेळी कुंभारवेस चौकातून फडके हौद चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौक, जिजामाता चौक, गणेश रस्‍त्‍यामार्गे पुढे जावे. तर सूर्या हॉस्पिटलकडून पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी शिवाजी रस्‍ता, जिजामाता चौकातून डावीकडे वळून जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

तर, येरवडा वाहतूक विभागामार्फत तारकेश्‍वर चौकाकडून गुंजन चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्‍यात येईल. त्‍यानुसार तारकेश्‍वर चौकाकडून येणाऱ्या वाहनचालकांनी शादलबाबा चौकातून उजवीकडे वळून आंबेडकर चौकातून त्‍यांना इच्छित स्‍थळी जाता येईल. संगमवाडीकडून तारकेश्‍वर चौकाकडे जाणारी वाहतूक देखील वळविण्‍यात येणार असून संगमवाडीकडून येणाऱ्या वाहनचालकांना आंबेडकर चौकातून उजवीकडे वळून पुढे जाता येईल. तर, चंद्रमा चौकातून तारकेश्‍वर चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्‍यात येणार असून त्‍यांना शादलबाबा चौकातून डावीकडे वळून आंबेडकर चौक मार्गे गोल्फ क्‍लब चौकातुन पुढे जाता येईल, असे आवाहन पोलिसांनी पुणेकरांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT