Pune Traffic Changes Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic: गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Pune Ganapati Visarjan: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्त मोठी गर्दी करतात. यामुळे पुण्यातील सर्वच रस्त्यांवर विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मोठी गर्दी असते. अशामध्ये पुणे वाहतूक पोलिसांनी पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल केले आहेत. शहरातील अनेक रस्ते बंद राहणार आहेत.

Priya More

Summary -

  • गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त पुण्यातील महत्त्वाचे रस्ते बंद.

  • लक्ष्मी रोड, टिळक रोड, जे.एम. रोडसह अनेक रस्त्यांवर वाहतूक बदल.

  • पुणे पोलिसांनी पर्यायी मार्ग आणि नो पार्किंग झोनची यादी जाहीर केली.

  • पुणेकरांनी प्रवासापूर्वी ट्रॅफिक अपडेट तपासण्याचे आवाहन.

अक्षय बडवे, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. गणेश विसर्जन सोहळ्याच्या दिवशी पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे शहरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणे पोलिसांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीमध्ये झालेल्या बदलासंदर्भातील माहिती जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी कोणते रस्ते बंद राहणार आणि पर्यायी मार्ग कोणते ते देखील सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या शनिवारी होणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्यानिमित्त पुण्यातील बहुतांश सर्वच महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. अनंत चतुर्दशीच्या निमित्त पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यामुळे वाहन चालकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

येत्या शनिवारी सकाळी ९.३० वाजता पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होत असल्यामुळे मध्यवर्ती भागातील बहुतांश सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिली आहे. हे सर्व रस्ते किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत बंद राहणार आणि त्यासाठी पर्यायी मार्ग कोणते हे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचसोबत पार्किंगची व्यवस्था कुठे करण्यात आली आहे याची माहिती देखील देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी पुण्यामध्ये प्रवास करताना पुणेकरांनी आधी बंद रस्त्यांची संपूर्ण यादी पाहून घराबाहेर पडावे आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.

विसर्जन सोहळ्या दिवशी कुठले रस्ते राहणार बंद -

लक्ष्मी रोड: सकाळी ७ पासून मिरवणूक संपेपर्यंत

टिळक रोड: सकाळी ९ पासून मिरवणूक संपेपर्यंत

केळकर रोड: सकाळी १० पासून मिरवणूक संपेपर्यंत

कुमठेकर रोड: दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत

शिवाजी रोड: सकाळी ७ पासून मिरवणूक संपेपर्यंत

गणेश रोड: सकाळी १० पासून मिरवणूक संपेपर्यंत

बाजीराव रोड: दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत

शास्त्री रोड: दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत

जे एम रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत

कर्वे रोड: सायंकाळी ४ पासून पासून मिरवणूक संपेपर्यंत

फर्ग्युसन रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत

पुणे सातारा रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत

पुणे सोलापूर रोड: सायंकाळी ४ पासून मिरवणूक संपेपर्यंत

पुण्यातील या रस्त्यांवर असणार नो पार्किंग

लक्ष्मी रोड: संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक

केळकर रोड: बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक

कुमठेकर रोड: शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक

टिळक रोड: जेधे चौक ते अलका टॉकीज चौक

शास्त्री रोड: सेनादत्त पोलिस चौकी ते अलका टॉकीज चौक

कर्वे रोड: नळ स्टॉप ते खंडोजी बाबा चौक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT