Pune Traffic meta ai
मुंबई/पुणे

Pune Traffic : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, २ दिवस हे रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते? यादी एका क्लिकवर

Pune Dahi Handi traffic restrictions : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४ आणि ५ सप्टेंबर रोजी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. काही प्रमुख रस्ते बंद राहणार असून नागरिकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

Pune Dahi Handi alternative traffic routes : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील मध्यवर्ती भागांसह विविध महत्त्वाच्या मार्गांवर ४ आणि ५ सप्टेंबर रोजी वाहतूक निर्बंध लादण्यात आले आहेत. काही प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद राहणार आहेत. गर्दीच्या काळात शहरात मोठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग खुले केले आहेत. त्यामुळे पुणेकरांनो, दहीहंडीच्या दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी कोणते रस्ते बंद आहेत आणि कोणता पर्यायी मार्ग निवडायचा, हे नक्की जाणून घ्या...

श्रीकृष्ण जयंती व दहीहंडी उत्सवानिमित्त पुणे शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने ४ व ५ सप्टेंबर रोजी आवश्यकतेनुसार वाहतुकीत बदल केले आहे. फडके हौद परिसरात ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

जिजामाता चौक, सोन्या मारुती चौक, गणेश रोड तसेच फडके हौद परिसरातील वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. शिवरकर रोडवरही ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात येणार असून, संविधान चौक, साळुंखे विहार रोड, फ्लॉवर व्हॅली लेन आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

याशिवाय लष्कर, वारजे, समर्थ, बंडगार्डन आणि काळेपडळ वाहतूक विभागांच्या हद्दीतही गर्दीच्या परिस्थितीनुसार विविध मार्गांवर वाहतुकीचे नियमन व मार्गबदल करण्यात येणार आहेत. काही ठिकाणी वाहतूक एकेरी करण्यात येणार असून, काही मार्ग पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दहीहंडी उत्सवाच्या काळात नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, उपलब्ध पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : स्पा सेंटरच्या बंद दाराआड नको ते धंदे, पश्चिम बंगालच्या ६ महिला रंगेहाथ सापडल्या; पोलिसांनी दार उघडलं अन्...

Maharashtra News Live Update: पुणे- विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा गणेश मंडळांनी केला निषेध

Akola : नामांकित कृषी विद्यापीठात ३८ लाख रुपयांचा घोटाळा, डॉ. श्यामसुंदर मानेंनसह ७ जणांवर गुन्हा

Chiku Khanyache Fayde: दररोज १ चिकू खा अन् ३० दिवसांत फरक बघा; शरीरात होतील 'हे' ५ मोठे बदल

Health Tips : सतत थकवा, चक्कर येतेय? रक्त कमी झालंय? या 8 भाज्या नक्की खा, १ आवड्यात वाढेल रक्त

SCROLL FOR NEXT