Pune Saam
मुंबई/पुणे

Pune News: कोथरुड, वारजे ते येरवडा, बाणेर, हडपसर; पुणे शहरातील ६१ रस्ते खोदले जाणार

Construction Work on 61 Pune Roads: Traffic Disruption Expected: पुणे शहरातील नागरी सुविधांसाठी लवकरच ६१ रस्त्यांवर खोदकाम सुरू होणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेला परवानगी दिली असली, तरी ती कडक अटींसह आहे.

Bhagyashree Kamble

पुणे शहरातील नागरी सुविधांसाठी लवकरच ६१ रस्त्यांवर खोदकाम होणार आहे. महापालिकेच्या मलनिःसरण विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी हे खोदकामाचे काम केले जाणार आहे. यासाठी वाहतुक पोलिसांनी पुणे महापालिकेला परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी काही कठोर अटींसह असल्याची माहिती समोर आली आहे.

३१ मे अंतिम मुदत अन्यथा कारवाई

वाहतुक पोलिसांनी महापालिकेला तंबी दिली आहे. सर्व खोदकाम ३१ मे पूर्वी करावी लागतील. अन्यथा संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा वाहतुक पोलिसांनी दिला आहे. यासाठी सर्व कामांचे वेळापत्रक महापालिकेडून मागवण्यात आले आहे.

खोदकाम होणारे प्रमुख भाग

कोथरूड

वारजे

येरवडा

बाणेर

हडपसर

बालेवाडी

बी.टी कवडे रोड

कोंढवाट

बिबवेवाडी

धानोरी

शिवाजीनगर

सारसबाग

नागरिकांना काय लक्षात घ्यावं?

या खोदकामामुळे संबंधित परिसरांमध्ये वाहतूक कोंडी, पर्यायी मार्ग तसेच थोडीशी असुविधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास योजना आधीच आखावी, असं आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT