New Highway Saam Tv
मुंबई/पुणे

New Highway: पुणे ते नाशिक प्रवास होणार सुसाट, चाकण- तळेगावजवळ तयार होतोय नवा मार्ग

MIDC Alternative Road to Chanak Talegaon to Nashik Highway: जुन्या मुंबई पुणे महामार्गावरुन पुढे गेल्यावर चाकण-तळेगावमध्ये नेहमी वाहतूक कोंडी असते. आता तुम्हाला थेट पुणे-नाशिक हायवेला जाता येणार आहे.

Siddhi Hande

तळेगाव-चाकण-शिक्रापूरमधील वाहतूक कोंडी कमी होणार

जुन्या मुंबई पुणे हायवेवरुन थेट नाशिक गाठता येणार

नवीन पर्याय मार्गाचे काम अंतिम टप्प्यात

जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करताना चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात नेहमी वाहतूक कोंडी असते. अनेकदा काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासनतास एकाच ठिकाणी थांबावे लागते. चाकण आणिआता तुम्हाला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पुणे-नाशिक महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास सुसाट होणार आहे.

आता तुम्हाला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन पुणे-नाशिक महामार्गावर जाता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास सुसाट होणार आहे.

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला आहे. यामुळे या परिसरातून रोज हजारो वाहने जातात. या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या सतात्याने वाढत आहे. यामुळेच ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एमआयडीसीने पर्याय रस्त्याचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल. नवीन रस्ता मुंबई पुणे जुन्या महामार्गावरुन सुरु होणार आहोत. तो पुढे देहूरोडकडून तळेगाव एमआयडीसीत प्रवेश करता येईल.

तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील नवलाख उंबरे गावाबाहेरुन नवीन रस्ता करण्यात आला आहे. या ठिकाणी गावातून एक रस्ता आहे. मात्र, अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.आता नवीन रस्त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणारआहे.

ह्युंदाई चौक ते तळेगाव आणि चाकणमध्ये हा रस्ता पुढे जाईल. यानंतर हा रस्ता कॉर्निंग कंपनीपासून भाम नदीपर्यंत रस्ता असेल. तिथून पुढे पुणे नाशिक महामार्गाशी जोडला गेला आहे.त्यामुळे चाकण तळेगाव शिक्रापूर रस्त्याला हा पर्यायी रस्ता असणार आहे. तळगाव औद्योगिक क्षेत्रात चाकण-तळेगाव- शिक्रापूर हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरुन सध्या वाहतूक होत आहे. मात्र, रस्ते लहान असल्याने वाहतूक कोंडीची समस्या होते. दरम्यान, आता यालाच पर्यायी रस्ता काढला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT