Pune Terrorist News Update Saam TV
मुंबई/पुणे

Pune Terrorist News Update: पुणे दहशतवादी प्रकणात ATS ची मोठी कारवाई, ठाण्यातून पाचव्या आरोपीला अटक

Maharashtra ATS Action: कोथरुड परिसरातून अटक करण्यात आलेल्या 2 दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन त्याला अटक करण्यात आली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुणे दहशतवादी प्रकरणामध्ये (Pune Terrorist Case) एटीएसने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी एटीएसने आणखी एकालाे अटक केली आहे. पुण्यातल्या कोथरुड परिसरातून अटक (Pune Terrorist Arrest) करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांशी या व्यक्तीचा संबंध असल्याच्या संशयावरुन त्याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एटीएसने ५ जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवादी विरोधी पथक म्हणजे एटीएसने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातल्या पडघा यथे राहणारा झुल्फिकार अली बडोदावाला असं अटक केलेल्या पाचव्या आरोपीचे नाव आहे. एटीएसने याआधी चार जणांना अटक केली होती. आता याप्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आल्यामुळे पाच जण झाले आहेत.

अटक करण्यात आलेला झुल्फिकार अली बडोदावाला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. २८ जून २०२३ रोजी इसीस दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर कारवाया केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली होती. त्यात झुल्फिकार अली बडोदावाला याचा समावेश होता.

'एनआयए'ने महाराष्ट्र इसीस मॉड्यूलप्रकरणी डॉ. अदनान अली सरकार याला कोंढव्यातून नुकतीच अटक केली होती. झुल्फिकार हा अदनान अली याचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यावरून पुण्यात पकडलेले दहशतवादी आणि इसीसचे 'कनेक्शन' असल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. दरम्यान, झुल्फिकार अली बडोदावालाच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

SCROLL FOR NEXT