Pune Swargate ST Depot Case Update Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Swargate ST Depot Case : दत्ता गाडेचा मोठा पराक्रम, CID कडून ३ कलमांची वाढ; गुन्हे ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल

Datta Gade Pune Case : स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. पुणे पोलिसांनी गाडेवर आणखी ३ कलमांची वाढ केल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपो बलात्कार प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. आज न्यायालयाने दत्ता गाडेला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी दत्ता गाडेच्या नावावर आणखी ३ कलमांची वाढ केली आहे. पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने २ वेळा संभोग करणे अशा गंभीर स्वरुपाच्या कलमांची वाढ पोलिसांनी केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे दत्ता गाडेच्या अडचणी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी स्वारगेट एसटी बस डेपो बलात्कार प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२), ११५ (२) आणि १२७ (२) या कलमांची वाढ केली आहे. पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडित तरुणीचे घटनेच्यावेळी परिधान केलेले कपडे जप्त करुन क्राइम लॅबकडे पाठवले होते.

आज दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे त्याला पुणे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पुणे सत्र न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान शोधमोहिमेनंतरही दत्तात्रय गाडेचा मोबाईल अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HPCL Recruitment: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी, पगार २.८ लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT