Pune Swaragte St Depot Dattatray Gade Case Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Swargate ST Depot Case : स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट, सगळं सत्य समोर येणार

Dattatray Gade Pune Case : पुण्यातील स्वारगेट डेपो बलात्कार प्रकरणाचा तपास आता पुणे गुन्हे शाखा करणार आहे. आतापर्यंत स्वारगेट पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला ताब्यात घेतले. या प्रकरणातील अपडेट समोर आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेद्वारे केला जाणार आहे. संध्याकाळी पुणे गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा वर्ग होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास स्वारगेट पोलीस करत होते. आता या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखा करणार आहे. यासंबंधित आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. त्यांच्या आदेशानुसार, स्वारगेट पोलिसांकडून या प्रकरणाची जबाबदारी गुन्हे शाखेकडे सुपूर्त केली जाणार आहे.

दरम्यान बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे. या चाचणीचा अहवाल लवकरच पोलिसांना मिळणार आहे. याशिवाय ज्या रिकाम्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली, तेथील तपासणी फॉरेन्सीक पथकाकडून करण्यात आली आहे. बसमध्ये दत्ता गाडेच्या केसांसह अनेक गोष्टी सापडल्या आहेत. या गोष्टींची आणि दत्ता गाडेच्या डीएनएची पडताळणी होणार आहे.

दत्ता गाडेच्या वकिलाने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी पुरावे सादर करताच तो दावा फोल ठरला. आता आरोपीच्या वकिलाने यू-टर्न घेतल्याचे समोर आले आहे. वकिलाने आर्थिक व्यवहार झाल्याचे आम्ही बोललो नाही असे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले. याशिवाय त्यांनी आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे असेही वक्तव्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: शिवीगाळाचं समर्थन नाही; पण FIR सुद्धा योग्य नाही, अभिजीत दिपके स्पष्ट बोलला

Heart-Brain Health : निरोगी हृदय, तल्लख मेंदू! आजपासूनच करा 'हे' सोपे उपाय, हार्ट अटॅकचा धोका टळेल

Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, आज वाढ झाली की घसरण? वाचा तुमच्या शहरातील दर

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारात लवकरच होणार वाढ, 'या' महत्त्वाच्या तारखा नोट करा

SCROLL FOR NEXT