Pune-Solapur highway accident Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव डंपरची कारला धडक, पिता-पुत्र जागेवरच गेले; तिघे गंभीर जखमी

Pune-Solapur highway accident : पुणे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. सुसाट वेगात असलेल्या डंपरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही पुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर मंगळवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. सुसाट वेगात असलेल्या डंपरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

अभिजित सुरेश पवार (वय ३६) आणि सुरेश प्रभाकर पवार (वय ६२) अशी अपघातात (Pune Accident) मृत्युमुखी पडलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. तर अभिजित यांची पत्नी प्रणिता पवार, पुतण्या रियांश पवार आणि आई सुलोचना पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील (Pune News) ट्रिनिटी सोसायटी, बकोरी फाटा, वाघोली येथे राहणारे पवार कुटुंबिय काही कामानिमित्त बाहेर गेले होते. मंगळवारी रात्री पुण्याकडे परतत असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्याजवळ गणेशवाडी येथे त्यांच्या कारला एका डंपरने जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की डंपरच्या धडकेत कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत अभिजित सुरेश पवार आणि सुरेश प्रभाकर पवार या पिता-पुत्रांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

नागरिक आपल्याकडे येत असल्याचं पाहून डंपरचालक पसार झाला. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत बचावकार्य केले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात डंपरचालक संदेश लक्ष्मणराव पवार (वय ३३, रा. वाघोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT