Manoj Jarange Patil  Saam Digital
मुंबई/पुणे

Manoj Jarange News : मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर पुण्यात गुन्हा दाखल

Manoj Jarange Latest News in Marathi : मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. या प्रकरणी मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

Manoj Jarange Latest News :

मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि शिंदे सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. प्रशासनाने मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटीमधील मंडप हटविण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांचे समर्थक देखील आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या वादादरम्यान, मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. या प्रकरणी मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील मनोज जरांगे यांच्या समर्थकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. याचदरम्यान मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी व्हिडिओ द्वारे ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली. या प्रकरणी आरोपींवर कलम 153 अ आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मनोज जरांगे यांनी व्यक्त केली दिलगिरी

मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर जरांगे यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळातून मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर काल मनोज जरांगे यांनी दिलगिरी व्यक्त केली. 'मी बोलताना काही अपशब्द वापरले असतील तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात जरांगे यांनी दिलगिरी व्यक्त केली.

'माझी उपोषणामुळे तब्येत ठिक नव्हती. माझ्याकडून अनावधानाने काही चुकीचे शब्द गेले असतील, तर मी दिलगीरी व्यक्त करतो. माझ्या पोटात 16-17 दिवस अन्नाचा एकही कण नव्हता. मी माझ्या माता माऊलीला मानतो. त्यामुळे माझ्याकडून चुकीचे शब्द गेले असतील तर माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. कारण चूक झाल्यावर दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT