Pune PMPML Bus Accident AI Image
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात भयंकर दुर्घटना! तरूणी धावत्या PMPML बसमधून पडली, मागून येणाऱ्या स्कुल बसने चिरडले

Pune PMPML Bus Accident News : पुण्यातील सिंहगड रोडवर PMPML बसमधून पडलेल्या तरुणीचा स्कूल बसच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू. ब्रह्मा हॉटेलसमोरील या भीषण अपघाताचा पोलीस तपास सुरू.

Alisha Khedekar

  • पुण्यातील सिंहगड रोडवर PMPML बसमधून पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

  • गर्दीमुळे तरुणीचा बसमधून तोल गेल्याची प्राथमिक माहिती

  • स्कूल बसची धडक बसल्याने तरुणीचा मृत्यू

  • पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अपघाताचा तपास सुरू केला आहे

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोडवर PMPML बसमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. सिंहगड रोडवरील ब्रह्मा हॉटेलसमोर सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये गर्दी असल्याने तरुणी खाली पडली असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात खळब उडाली असून पोलीस तपास सुरु आहे. दरम्यान तरुणीच्या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खानापूरहून स्वारगेटच्या दिशेने पीएमपीएलची बस प्रवास करत होती. सकाळच्या वेळेमुळे बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होती. सिंहगड रोडवरील ब्रह्मा हॉटेलसमोर बस येत असताना गर्दीच्या परिस्थितीत तरुणीचा तोल गेला आणि ती बसमधून रस्त्यावर पडली. दरम्यान, त्याच मार्गावरून पाठीमागून एक स्कूल बस येत होती. रस्त्यावर पडलेल्या तरुणीला या बसची धडक बसली आणि ती स्कूल बसच्या चाकाखाली आली.

या भीषण अपघातात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित यंत्रणांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली असून, अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा PMPML बसमधील वाढती गर्दी, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि बस थांब्यांवरील वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेषतः सकाळच्या गर्दीच्या वेळेत बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, मृत तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

Tea or Coffee During Fasting: उपवासाला चहा- कॉफी पिऊ शकतो का? जाणून घ्या

Bank Close: बँकेची कामं पडणारं पेंडिंगवर; सोमवारी बँका असतील बंद, काय आहे कारण

Maharashtra News Live Update: Mumbai: गृहमंत्री अमित शाह यांची पत्रकार परिषद

Vastu Tips for Bathroom Taps: बाथरूममध्ये नळ बसवताना लक्षात ठेवाव्यात ‘या’ ५ महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT