Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात रक्तरंजित थरार! नोकरी गेल्याने तरुणाचं भयंकर कृत्य, भररस्त्यात स्वत:च्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं

Pune Police: पुण्यामध्ये एका तरुणाने नोकरी गेल्याच्या चिंतेतून भयंकर कृत्य केले. या तरुणाने भररस्त्यात ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

Summary -

  • पुण्यातील एफसी रोडवर धक्कादायक घटना

  • नोकरी गेल्यामुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

  • भररस्त्यात ब्लेडने गळ्यावर वार केले

  • गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू

पुण्यामध्ये एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वत:च्याच गळ्यावरून ब्लेड फिरवल्याची धक्कादायक घटना घडली. नोकरी गेल्यामुळे नैराश्येत येऊन या तरुणाने हे कृत्य केले. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर ही घटना घडली. भररस्त्यात या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य सातपुते (वय ४१ वर्षे) असं या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा मुंबईतील बोरीवलीमध्ये राहणारा आहे. पुण्यामध्ये तो नोकरी करत असून भोसले नगर भागात राहतो. हातातून नोकरी गेल्यामुळे आदित्य चिंतेत आला. शनिवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास आदित्य पुण्यातील एफसी रोड परिसरातील खाऊ गल्लीत आला. त्याठिकाणी त्याने हे धक्कादायक कृत्य केले.

शनिवारी रात्री आदित्यने स्वतःच्या हाताने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडच्या सहाय्याने वार करून घेतले. या घटनेत आदित्य गंभीर जखमी झाला आणि जास्त रक्तस्राव होऊ लागला. या घटनेमुळे एफसी रोडवर एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी झालेल्या आदित्यला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नोकरी गेल्याच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

SCROLL FOR NEXT