pune crime news Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

pune crime news : पुण्यात हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. नराधमाने लिव्ह-इन पार्टनरच्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवल्याची घटना घडली आहे.

रोहिदास गाडगे

पुण्याच्या शिरूरमध्ये घडला हत्येचा थरार

तरुणाने केली लिव्ह-इन पार्टनरच्या मुलाची हत्या

तरुणाच्या कृत्याने परिसरात खळबळ

पुण्याच्या शिरूरमध्ये हादरवणारा प्रकार घडला आहे. शिरूरच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलगा असलेल्या आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरुणाच्या कृत्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव परिसरात एका मुलाच्या आईसोबत तरुण राहत होता. मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडण्याच्या कारणावरून आरोपी आणि महिलेत वाद सुरू झाले. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वादानंतर मुलाची आई सकाळी कामावर निघून गेली. त्यानंतर घरात एकट्या असलेल्या चिमुकल्याची आरोपी हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर रांजणगाव परिसरात खळबल उडाली आहे. पोलिसांनी आरोपी देवांशी साहू या २० वर्षीय आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस निरीक्षक रांजणगाव कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येची घटना घडली. एकाने तीन वर्षांच्या मुलाची हत्या केली. मुलाची आई आरोपी तरुणासोबत एकत्र राहत होती. महिलेला एक ३ वर्षांचा मुलगा होता. महिला कामाला गेली होती. त्यावेळी आरोपीने सांयकाळी फोन करून सांगितले की, तुझा मुलगा आता राहिला नाही.

'आरोपीच्या फोननंतर महिला घरी धावत गेली. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. घरात शिरल्यानंतर मुलाचा मृतदेह आढळला. त्याच्या तोंडावर जखमा होत्या. यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला, असेही पोलिसांनी पुढे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

"ते सेल्फी पूर्णपणे मॉर्फ केलेले..."; व्हायरल फोटोंवर मंत्री गिरीश महाजनांचा सर्वात मोठा आणि थेट खुलासा

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट येण्याच्या १० मिनिटं अगोदर दिसतात ही लक्षणं; वाचा कसा वाचवू शकाल जीव?

SCROLL FOR NEXT