Pune crime Saam
मुंबई/पुणे

Pune crime: 'बायकोच्या त्रासाला कंटाळलो, मी जीव देतोय...' VIDEO शूट करून नवऱ्यानं गळफास घेत आयुष्य संपवलं

Pune Shocking Incident: पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून एका ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्याने व्हिडिओ शूट करून आयुष्य संपवलं आहे.

Bhagyashree Kamble

गेल्या काही काळात सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर येत असतानाच, पुण्यातून एक वेगळीच घटना समोर येत आहे. विवाहित पुरूषाने पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नी मानसिक त्रास देत असल्याकारणाने तरूणाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शूट करून शेअर केला होता. यात त्याने आपबिती सांगितली होती. या प्रकरणात महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुरज दामोदर पवार (वय वर्ष ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. तरूणाने आत्महत्या केल्यानंतर मृत तरूणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सुरज पवार आणि मयुरी जाधव यांचं लग्न झालं होतं. हे जोडपं कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्तीत राहत होते. बुधवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झालं होतं.

भांडणादरम्यान, पत्नीने दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून सुरजने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ शूट केला. व्हिडिओमध्ये त्याने मानसिक त्रास, भांडण आणि मारहाणीमुळे आयुष्य संपवत असल्याचं सांगितलं. त्याच्या आत्महत्येस पत्नी जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तक्रारीनुसार मयुरी पवार हिच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पवार कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT