Pune News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुणे तिथे काय उणे! महिलेने घरात पाळल्या तब्बल ३५० मांजरी, कारवाईसाठी गेलेला आरोग्य अधिकारी चक्कर येऊन पडला

Pune municipal corporation: पुण्यातील हडपसर भागात असणाऱ्या मार्व्हल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने घरामध्ये तब्बल ३५० मांजरी पाळल्या. त्यामुळे या सोसायटीमधील नागरिक संतप्त झाले आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये एका महिलेने घरामध्ये एक-दोन नाही तर तब्बल ३०० पेक्षा जास्त मांजरी पाळल्या आहेत. या महिलेच्या प्रतापामुळे सोसायटीमध्ये राहणारे नागरिक त्रस्त झाले आहेत. या नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर आरोग्य अधिकारी आणि पोलिसांचे पथक कारवाईसाठी या महिलेच्या घरी आले होते. त्यावेळी घरात असलेल्या दुर्गंधीमुळे आरोग्य अधिकारी चक्कर येऊन पडल्याची घटना घडली. या महिलेमुळे सोसायटीमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. या महिलेला यापूर्वी देखील पोलिसांनी आणि पालिकेकडून नोटीस देण्यात आली होती तरी देखील तिने ऐकले नाही म्हणून अधिकारीच कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी अधिकाऱ्याला चक्कर आली.

पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही. कारण देखील असंच काहीस आहे पुण्यातील हडपसर भागात असणाऱ्या मार्व्हल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने एक दोन नव्हे तर तब्बल ३०० हून अधिक मांजरी ३ बीएचके फ्लॅटमध्ये पाळल्या आहेत. त्यामुळेच हा विषय चर्चेचा विषय ठरला असून या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना याचा प्रचंड मनस्ताप होत आहे. मांजरीमुळे पसरलेली दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहिला मिळत आहे.

या सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधल्यानंतर अशा गोष्टी लक्षात आल्या की, गेल्या ५ वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे. गेली १० वर्षे झालं ही महिला या सोसायटीमध्ये राहत आहे. मांजर पाळण्याबाबत आम्हाला काहीच त्रास नाही. पण त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना काही त्रास होऊ नये असे वागाने असे सोसायटीमधील नागरिकांचे म्हणणे आहे. या मांजरांमुळे येणारा उग्र वास आणि ड्रेनेजमध्ये जाणार पाण्यामुळे सोसायटीमधील लोकांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच सकाळी दुपारी आणि संध्याकाळी या मांजराचा खूप जोरात रडण्याचा आवाज येतो. यामुळे आम्हाला खूप त्रास होतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.

सोसायटीतील दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की, जेवण तयार करताना असो की इतर वेळेस जेव्हा दरवाजा आणि खिडकी आम्ही उघडतो तेव्हा प्रचंड घाण वास येतो. २०२० मध्ये आम्हाला कळालं की, ९ नंबरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रहिवाशी यांच् कडे मांजर आहेत. परंतू तेव्हा त्यांच्याकडे फक्त ५० मांजरी होत्या. तेव्हा आम्ही पुणे महानगर पालिका, पोलिस प्रशासन यांच्याकडे तक्रार केली होती. आता पालिका प्रशासनाने या महिलेला सबंधित विषयावर नोटीस देखील दिली. यामुळे प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! महायुती-महाविकास आघाडीला धक्का, मुंडेंनी स्थापन केला नवा पक्ष|VIDEO

सख्खे भाऊ पक्के विरोधक! ऐन निवडणुकीत आमदाराच्या भावानं साथ सोडली, भाजपचं कमळ हाती घेणार

KDMC Election : एकनाथ शिंदेंचा मित्रपक्ष भाजपलाच जोरदार धक्का; डोंबिवलीत मोठी उलथापालथ

Maharashtra Live News Update : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, पुण्यातील मराठा सेवकांची मागणी

Rupali Thombare Photos: फ्रायरब्रँड नेत्या, रुपाली पाटील ठोंबरेंविषयी 'या' 6 गोष्टी माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT