Violence Over Cigarettes in Pune Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime: सिगारेट न दिल्याचा राग, तरूणांनी कोयत्यानं दुकानच फोडलं; घटना सीसीटीव्हीत कैद

Violence Over Cigarettes in Pune: पुण्यात सिगारेट न दिल्याच्या रागातून अल्पवयीन तरुणांनी कोयत्याने दुकानावर हल्ला केला. सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली असून, आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Bhagyashree Kamble

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आणखी एका घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सिगारेट न दिल्याच्या रागातून तरूणांच्या टोळक्याने दुकानदाराला शिवीगाळ करत दुकान फोडलंय. दुकानावर कोयत्याने वार करत दुकानाचं नुकसान केलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणानंतर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

ही संतापजनक घटना पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी तरूण आधी दुकानात गेले. हे तरूण दुकानदाराच्या ओळखीचे असल्याची माहिती आहे. अल्पवयीन तरूणांनी दुकानदाराकडे सिगारेटची मागणी केली. मात्र, दुकानदाराने सिगारेट देण्यास नकार दिला. यानंतर तरूण निघून गेले.

नंतर ते पुन्हा दुकानात परतले, तसेच दुकानदाराशी वाद घातला. तरूणांनी शिवराळ भाषेत दमदाटीही केली. नंतर कोयता बाहेर काढून थेट दुकानावर हल्ला चढवला. या अचानक हल्ल्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्याची नोंद केली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड देगलूर तालुक्यातील हानेगांवजवळ एक भीषण अपघाताची घडली आहे. एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नरसिंग पाटील आणि सोपान बिरादार असे मृत व्यक्तींची नावे आहेत. हा अपघात घडल्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा घडला? हे अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी मरखेल पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्राचे आरोग्याशी संबंधित दोष कोणते आहेत?

Ind Vs Eng Lord Test : जे सचिन-विराटला जमलं नाही, ते केएल राहुलनं करुन दाखवलं, पठ्ठ्यानं लॉर्ड्सचं मैदान गाजवलं

जगात मुस्लीम लोकसंख्येचा विस्फोट,भारत होणार लोकसंख्येत मोठा मुस्लीम देश? देशात हिंदू लोकसंख्या किती?

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

SCROLL FOR NEXT