Pune woman killing Case saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

woman killed near garbage depot in pune : पुण्यात एका तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना उघड झालीय. कचरा डेपोजवळ या तरुणीचा मृतदेह आढळला होता.

Nandkumar Joshi

सचिन जाधव, पुणे | साम टीव्ही

पुण्यातील बालिकेवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं महाराष्ट्रातील महिला सुरक्षिततेचा मुद्दा पेटला असतानाच, मुंढवा परिसरात तरुणीच्या हत्येची घटना घडली आहे. हत्या झालेली तरुणी ही ब्युटीपार्लरचा व्यवसाय करत होती. कचरा डेपोजवळ तिचा मृतदेह आढळला होता. तिची गळा आवळून हत्या केल्याचे अहवालातून उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

तरुणीच्या हत्येचं कारण उघड

आफरीन सलीम पठाण असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. ती वडगाव शेरी येथे राहत होती. मूळची पालघर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. गोरखनाथ देवराव शिंदे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या चंदननगरमध्ये राहत आहे. मूळचा बीड येथील रहिवासी आहे. आर्थिक वादातून त्याने तरुणीची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. गुन्हे शाखेने या प्रकरणात गोरखनाथला अटक केली.

कचरा डेपोजवळ आढळला होता मृतदेह

मुंढवा येथील केशवनगर कचरा डेपोजवळ रस्त्याच्या कडेचा या तरुणीचा मृतदेह आढळला होता. (pune crime accused arrested in woman murder case) ससून रुग्णालयात तिचा मृतदेह विच्छेदनासाठी नेण्यात आला. तिची गळा आवळून हत्या केल्याचे अहवालात स्पष्ट झाले.

दोन वर्षांपूर्वी ओळख, मैत्री आणि नंतर हत्या

मृत तरुणी आणि आरोपी गोरखनाथ या दोघांची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले. आफरीनने गोरखनाथकडे एक लाख रुपये मागितले होते. ५ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दोघेही खराडी बायपासजवळ भेटले. त्याने तरुणीला ५० हजार रुपये दिले होते. पण तिने एक लाख रुपये पाहिजेत असा हट्ट धरला. पैसे दिले नाही तर कुटुंबीयांना सांगेल अशी धमकी तिने दिली. गोरखनाथला राग अनावर झाला. त्यानं तिचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह कचरा डेपोजवळ फेकून दिला. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ३ वाहनांचा विचित्र अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू; मिसिंग लिंकवर वाहतूक ठप्प

Famous Singer Death : संगीत क्षेत्रातला अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

महागड्या क्रिम्स कशाला? चेहऱ्याचे काळे डाग आणि खाज घालवण्यासाठी कापूर ठरेल वरदान; पाहा वापरण्याची योग्य पद्धत!

Monsoon Update : मान्सून लांबणीवर, पण राज्यात आज वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

IPL फायनल हरल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी दुर्घटना; भररस्त्यात टीमच्या बसला लागली आग, उडाली एकच खळबळ

SCROLL FOR NEXT