Vijay Shivtare News, Pune Latest Marathi News, Eknath Shinde Latest News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का; विजय शिवतारे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे दिसत आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेतील बंडाचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. काही ठिकाणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात शिवसैनिक निदर्शने करत आहेत, तर काही ठिकाणी शिंदे यांना समर्थन दिले जात आहे. आता पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Pune Latest Marathi News)

विजय शिवतारे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शिवतारे आपला निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती तोडावी अशी कार्यकर्त्यांकडून होत असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे ही बैठक बोलावली आहे.

सर्व पदाधिकऱ्यांसोबत बैठका सुरु असून, आज ठराव करणार आहेत. विजय शिवतारे आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवलं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. उद्याच बुमत सिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि प्रवीण देरेकर हे काल राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी बहूमताची चाचणीची मागणी केली होती.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत चाचणीची घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती समोर आली आहे. उद्याच महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT