पुणं पुन्हा हादरलं; एकाच दिवसात 3 बलात्काराचे गुन्हे दाखल! Saam Tv
मुंबई/पुणे

पुणं पुन्हा हादरलं; एकाच दिवसात 3 बलात्काराचे गुन्हे दाखल!

पुण्यात सोमवारी एकाच दिवशी बलात्काराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुण्यात सोमवारी एकाच दिवशी बलात्काराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात 9, 13 आणि 21 वर्षीय मुलींवर बलात्कार झाला आहे. एकाच दिवशी 3 अत्याचाराच्या घटना समोर आल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनांनी शहरात मुली, महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील पहा-

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीसात तक्रार दिली आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला आहे. या तरुणीने प्रतिकार केला, असता तिला झाडूने मारहाण केली आहे. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहूल जनार्दन खंडारे (वय- 39) याला अटक केली आहे.

दुसरी घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आहे. आरोपी कुणाल पटेल (वय- 20) याने पीडित मुलीसोबत ओळख करून तिच्या सोबत मैत्री केली. त्यानंतर मैत्रीचा गैरफायदा घेत तिच्या सोबत जबरदस्ती करत शरीरसंबध ठेवले होते. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

तिसरी नात्याला काळीमा फासणारी घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली आहे. बापानेच 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे. मागील 7 वर्षांपासून तो मुलीवर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवत होता. नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. कोंढवा पोलीस तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT