Pune Court News Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Court: लग्नाच्या आमिषाने बलात्कार केला म्हणणे योग्य नाही; पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

Pune Sessions Court On Physical Harassment : तरुण फोटोग्राफरवर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक आरोप होता. याप्रकरणी पुणे सत्र न्यायलयाने मोठा निर्णय दिलाय.

Bharat Jadhav

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

महिलांवरील बलात्काराचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांकडून अनेक प्रकरणात तात्काळ दखल घेतली जाते. मात्र कायद्याचा गैरवापर करून बलात्काराच्या खोट्या तक्रारींचे प्रमाण देखील सुद्धा वाढतंय. अशा एका प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलाय. पुण्यातील एका विवाहित महिलेने २१ वर्षीय तरुण फोटोग्राफरवर लग्नाचे आमिष देऊन फसवणूक केल्याचा आरोप ठेवत त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली.

पोलिसांनी तात्काळ त्याला अटक सुद्धा केली. आरोपीचं अगोदरच लग्न झाले असल्याचं महिलेला माहिती होतं. फोटोग्राफरबरोबर लग्न करणे शक्य नाही हे माहिती होते. त्यामुळे लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केला म्हणणे योग्य ठरणार नाही. तिच्या घरात आणि आरोपीच्या घरात जबरदस्तीने अत्याचार केले म्हणण्यास वाव नसल्याचे नमूद करत या प्रकरणात न्यायलयाने तरूणाला गुन्ह्यातून वगळण्याचा आदेश दिला.

दरम्यान राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत पोलीस तात्काळ दखल घेतात. मात्र यातील अनेक जण असे आहेत की कायद्याचा गैरवापर करून समोरच्या व्यक्तीला जाणून बुजून अडकून टाकायचं. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला मात्र न्यायालयाने याप्रकरणी एक मोठा निर्णय घेतलाय.

काय आहे नेमकं प्रकरण?

एका 26 वर्षीय विवाहित महिलेने एका 21 वर्षीय तरुणाच्या विरोधात लग्नाच्या आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तीन वर्षांपूर्वी फिर्यादी महिला ही या 21 वर्षीय तरुणाच्या फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी गेली होती, त्यावेळी त्या या दोघांची ओळख झाली.

काही महिन्यांपूर्वी या महिलेने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असल्याचे सांगत त्या तरुणाने लग्नाचे आम्हीच दाखवून फसवणूक केले असल्याची फिर्याद दिली. यात या तरुणाला अटक सुद्धा झाली होती तरूणाच्या वतीने अ‍ॅड. विभीषण गदादे यांनी खटल्यातून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयासमोर त्यांनी हा गुन्हा, खोटा आणि बनावट असून त्याला कुठलाच आधार नसल्याचे युक्तिवाद केला.

दोघांमध्ये व्हॉट्सॲपवर बोलणे होत असल्याचे पुरावे सुद्धा न्यायालयासमोर ठेवण्यात आले. प्रथमदर्शी तरूणाने लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवल्याचे पुरावे आढळून आले नसल्याचा युक्तीवाद वकिलांनी केला. त्यावर न्यायालयाने दाखल पुरावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यानुसार आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरावे नाहीत. त्यामुळे आरोपीविरूध्द खटला चालवणे व्यर्थ ठरेल, असा निर्णय दिला आणि त्या तरुणाची सुटका झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT