Pune crime Saam Tv
मुंबई/पुणे

Crime Pune: शिक्षणाच्या माहेरघरात मुली असुरक्षित; ४ मुलींसोबत व्हॅन चालकाकडून अश्लील कृत्य; धमकी देऊन चौघींना ओरबाडलं; पुणे सुन्न

Pune Crime News: एका शाळेतील व्हॅन चालकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने या मुलींना ही बाब कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शाळेतील एका व्हॅन चालकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आरोपीने त्यांना घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र, ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्हॅन चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील एका नामांकित शाळेतील एका व्हॅन चालकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींसोत अश्लील कृत्य केले आहे. आरोपी चालकाने मुलींसोबत अश्लील कृत्य करून ही बाब घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी ही घटना लपवून ठेवली होती.

मात्र, ही बाब समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित व्हॅन चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेची माहिती पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला पोलीस स्टेशनबाहेर चांगलाच चोप दिला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनीही नांदेड पोलीस ठाण्यात हजेरी लावून आरोपीला चोप दिला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT