Pune School saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात शाळेतील विद्यार्थ्याला मारहाण, कानशिलात लगावल्याने कानाला दुखापत; शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Pune School : सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या कानशिलात मारल्याने महिला शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला शारीरिक, मानसिक त्रास झाल्याचे पालकांनी म्हटले आहे.

Yash Shirke

  • पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल.

  • या शिक्षिकेने सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या कानशिलात मारली होती.

  • विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुण्यात शाळेकरी विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्याध्यपिकांकडे तक्रार करुनही कारवाई करण्यात आली नाही, उलट मुलाला वर्गातून बाहेर काढण्यात आले असे मुलाच्या आईने म्हटले आहे. मारहाणीमुळे मुलाच्या कानाला दुखापत झाल्याचेही त्याच्या आईने पोलिसांना सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या वाघोतील प्रसिद्ध चैतन्य टेक्नो स्कूल या शाळेत सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनंतर वाघोली पोलिसांनी कलम २९४५/२०२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीमुळे मुलावर वैद्यकीय उपचार सुरु असल्याचे त्याच्या पालकांनी म्हटले आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास त्यांच्या मुलाला महिला शिक्षिकेने कानशिलात लगावली. यामुळे त्याच्या कानाला दुखापत झाली. वेदना वाढल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी कानाला झालेल्या दुखापतीबाबत वैद्यकीय अहवाल दिला आहे. मुख्याध्यापिकांकडे तक्रार करुनही शिक्षिकेवर कारवाई झाली नाही.

१८ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शाळेच्या शिक्षिकेच्या मारहाणीमुळे मुलाला शारीरिक जखमांसहल गंभीर मानसिक धक्का देखील बसला आहे. या घटनेमुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. तक्रारीनंतर वाघोली पोलीस महिला शिक्षिकेवर आणि शाळेवर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT