Pune Crime SaamTv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळिमा..! धावत्या स्कूल बसमध्ये २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

Crime News : बदलापूरमधील घटनेचे पडसाद राज्यात अजून पडत आहेत. त्यात आता पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

Namdeo Kumbhar

नितीन पाटणकर, साम प्रतिनिधी

Pune Crime News : बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. धावत्या स्कूल बसमध्ये दोन अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणामुळे पुण्यात संतप्त वातावरण झालेय. पुण्यातील वानवडी येथे ही घटना घटली आहे. धक्कादायक म्हणजे बस चालक चार दिवस त्या चिमुरडीसोबत लैंगिक अत्याचार करत होता. बस चालकाविरोधात वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यात चालत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वानवडी परिसरातील धकादायक प्रकार घडला आहे. अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराध्यम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

बस चालकाने सहा वर्ष चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर मागील चार दिवसापासून चालत्या बस मध्ये लैंगिक अत्याचार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे काम करतो. या आरोपीच्या बस मध्ये दोन्ही पीडित चिमुरडी पुढच्या सीटवर बसत होत्या.

आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमुरडींना जवळ बसून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता. या विषयाची वाचता कुठे केला तर धमकी सुद्धा देत असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन चिमुरडी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेटच्या जागी वेदना होत होत्या.. यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्म अल्पवयीन चिमुरडीने आईला सांगितलं. यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT