Wreckage of motorcycles after a fatal crash on the Saswad-Veer road near Pune, where a drunk driver killed two people and injured a couple. Saam TV Marathi (संग्रहित छायाचित्र)
मुंबई/पुणे

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, इंजिनिअरने २ दुचाकींना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू, पती-पत्नी गंभीर जखमी

Pune accident news today : पुण्याजवळ सासवड-वीर रस्त्यावर मद्यधुंद कारचालकाने दोन दुचाकींना धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर नवरा-बायको गंभीर जखमी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Pune Saswad road accident updates : पुण्याजवळ सासवड-वीर रस्त्यावर एका मद्यधुंद कारचालकाने २ दुचाकींना जोरात धडक दिली. वळणावर झालेल्या या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक प्रचंड दारूच्या नशेत होता. त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् २ दुचाकींना जोरात धडक दिली.

पुरंदर येथील पांगारे येथील रवींद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेंद्र संपत काकडे (वय ५३) या दोघांचा सासवड भीषण अपघातात मृत्यू झाला. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, रा. पिंपळे) हे गंभीर जखमी झाले आहेत. सासवड अपघात प्रकरणी पोलिसांनी आरोपी चालक अक्षय सुहास परब याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक अक्षय हा सध्या हडपसर येथे राहत असून तो सिव्हिल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. तो मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी आहे, असे सासवड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांनी सांगितले.

सासवड अपघात प्रकरणाची प्रकाश काकडे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपी अक्षय आपल्या कारने (एमएच ४७ सीडी ७७०८) वीर बाजूकडून सासवडकडे भरधाव वेगात येत होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अक्षयने वळणावर समोरून येणाऱ्या काकडे आणि पोमण यांच्या दुचाकींना जोरदार धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.

अपघातानंतर कार चालक अक्षय परब याला अटक केली. तो दारूच्या नशेत असल्याचे आढळले. त्याला कोर्टात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तो सध्या येरवडा कारागृहात असून पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये पाण्याचा महापूर, फुटलेल्या पाइपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया

Hair Care: केसगळती कमी करायची आहे? मग 'हे' घरी बनवलेलं हेअर वॉटर अंघोळी केल्यानंतर १ स्प्रे करा

मराठवाड्यात 500 च्या नोटांचा तुटवडा; तुळजापूरमध्ये व्यापाऱ्यांना फटका

प्रशासनात मोठे फेरबदल! मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; १६ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Monsoon 2026: मोठी बातमी! वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान खात्याने तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT