RPI Kamgar Aghadi Maharashtra president Anil More was brutally killed in Moshi area of Pimpri-Chinchwad. Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Pune : आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या; एकट्याला गाठून धारदार शस्त्राने केले वार

Pimpri Chinchwad Crime News : आरपीआय कामगार आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल मोरे यांची मोशीतील रेस्टॉरंटमध्ये धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

Namdeo Kumbhar

गोपाल मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

Anil More murder case latest update : आरपीआय (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची काल रात्री धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात असलेल्या 'युवराज रेस्टॉरंट अँड बार' या ठिकाणी काल रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात हल्लेखोरांनी अनिल मोरे यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अनिल मोरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून आणि कोणी केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या त्यांचा मृतदेह पिंपरीतील वायसीएम (YCM) रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. अनिल मोरे यांच्या मारेकऱ्यांना पोलीस जोपर्यंत अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा आरपीआय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. अनिल मोरे हे आरपीआय (आठवले गट) मध्ये सक्रिय होते आणि कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची मोठी ओळख होती. त्यांच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वायसीएम (YCM) रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

प्राथमिक अंदाजानुसार अनिल मोरे यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, मात्र अधिकृत कारण तपासण्यात येत आहे. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर आरपीआयच्या वरिष्ठ नेत्यांनीही हजेरी लावली असून, शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका होत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माऊलींच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतचं होणार

Fort In Ratnagiri : मराठेशाहीचा सागरी पहारेकरी, शिवरायांच्या शौर्याची गाथा सांगतो रत्नागिरीतील 'हा' किल्ला

Mouni Roy Net Worth: मुंबईतील आलिशान घर अन् लक्झरी गाड्या; अभिनेत्री मौनी रॉय आहे 'इतक्या' कोटींची मालकीण

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला-भांडूप दरम्यान ३ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; अनेक लोकल रद्द, पाहा सविस्तर वेळापत्रक

Diabetes In Children: लहान मुलांमध्ये वाढतोय डायबिटीज, जाणून घ्या वयानुसार मुलांची शुगर लेव्हल नेमकी किती असावी?

SCROLL FOR NEXT