पुण्यात रस्ते अपघातांची संख्या वाढली; दिवसाआड एकाचा मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात रस्ते अपघातांची संख्या वाढली; दिवसाआड एकाचा मृत्यू

वाहतूक निमयांचे उल्लंघन करुन बेदरकारपणे वाहन चालवणे अनेकांच्या जीवावर बेतत आहे. हे प्रमाण इतके वाढले आहे की दिवसाआड पुण्यात रस्ते अपघातात एकाचा मृत्यू होत आहे. ही गांभीर्याची बाब आहे.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे : वाहतूक निमयांचे उल्लंघन करुन बेदरकारपणे वाहन चालवणे अनेकांच्या जीवावर बेतत आहे. हे प्रमाण  इतके वाढले आहे की दिवसाआड पुण्यात रस्ते अपघातात एकाचा मृत्यू होत आहे. ही गांभीर्याची बाब आहे. पुणे शहरातील विविध भागात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मध्यवर्ती शहराच्या तुलनेत उपनगरांत अपघाताचे प्रमाण अधिक आहे.

हे देखील पहा-

पुणे शहराच्या हद्दीत आता वाढ होत आहे, पुणे सातारा, पुणे सोलापूर रस्त्यावरील बराचसा भाग हा शहराच्या हद्दीत आलेला आहे. या रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक होत असते रात्री बेरात्री याठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करणे, अतिवेगाने वाहन चालवणे, विना हेल्मेट दुचाकी चालवणे, ट्रीपलसीट प्रवास, सिग्नल तोडणे असे प्रकार होत आहेत.  यावर्षी जानेवारी ते ऑगस्टपर्यंच्या कालावधीत शहरातंर्गत 394 अपघातांमध्ये तब्बल 134 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये बहुतांश तरूणांचा समावेश असल्याचं दिसून आल आहे.

पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे शहरात वैयक्तिक वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांची संख्या वाढतेय, वाहतूक विभागाकडून वारंवार आवाहन करण्यात येतेमतर तरीदेखील नागरिक वाहतुकीचे नियम मोडतात, विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, मोटार चालवताना सीटबेल्टचा वापर न करणे, सुसाट वाहने चालवणे, सिग्नलवर वाहतूक कर्मचारी न दिसल्यास नियमभंग करणे, विरुद्ध बाजूने वाहन चालवणे अशा कारणांमुळे अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. काही तरूण गाड्यांवर स्टंटबाजीही करतात त्यामुळे सुद्धा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

बेशिस्तपणा कमी झाल्यास गंभीर अपघातांसह किरकोळ अपघातही रोखण्यास मदत होणार आहे. ब्लॅक स्पॉट काढणे, अत्यावश्यक वाहतूक सूचनांचे फलक बसवणे, अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर प्रशासनाकडून भर देण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT