Pune Dengue Death 
मुंबई/पुणे

Dengue Death : ८ वर्षांच्या मुलीला 4-5 दिवस ताप आणि पोटदुखी; पुण्यात डेंगीचा पहिला बळी

Pune Dengue Death : पुण्यात डेंगीमुळे आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चार ते पाच दिवस ताप आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर तिची प्रकृती खालावली. डेंगी शॉक सिंड्रोममुळे अनेक अवयवांच्या कार्यावर परिणाम झाला. डेंगीची गंभीर लक्षणे वेळीच ओळखणे का महत्त्वाचे आहे, जाणून घ्या.

Akshay Badve

Pune reports its first dengue death : पुण्यामध्ये डेंगीमुळे ८ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात डेंगीच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवघ्या आठ वर्षांच्या एका चिमुरडीला सलग चार ते पाच दिवस ताप आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर प्रकृती झपाट्याने खालावल्याने तिला रुबी हॉल क्लिनिकच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, 'डेंगी शॉक सिंड्रोम'मुळे तिच्या शरीरातील अनेक अवयवांचे कार्य एकाच वेळी बिघडले आणि उपचारादरम्यान रविवारी रात्री तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

डेंगीची लागण झाल्यानंतर गुंतागुंत वाढल्याने फक्त ८ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रविवारी तिचा मृत्यू झाला असून डेंगीचा पुणे शहरातील हा या वर्षीचा पहिलाच मृत्यू ठरला आहे. रुबी हॉल क्लिनिक येथे बालरोगतज्ञ डॉ. प्रशांत उदावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार या चिमुकलीला रुबी च्या बाह्यरुग्ण विभागात आणण्यापूर्वी चार ते पाच दिवसांपासून ताप आणि पोटदुखीचा त्रास होता. यापूर्वी स्थानिक डॉक्टरांकडे त्यांनी उपचार घेतले होते.

लोहगाव परिसरातील स्थानिक रुग्णालयात सुमारे २४ तास उपचार घेतल्यानंतर मुलीची प्रकृती खालावली. दरम्यान, तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तातडीने रुबी हॉल मध्ये हलविण्यात आले. दाखल केल्यानंतर तिचा रक्तदाब कमी झाला होता आणि श्वसनाचा त्रास गंभीर स्वरूपाचा होता.

रुग्णालयात दाखल होताच तिला अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. रक्तातील प्लेटलेट्सची संख्या सुमारे ५० हजारांपर्यंत घसरली होती. डेंगीमुळे तिला 'डेंगी शॉक सिंड्रोम' चे निदान करण्यात आले. रविवारी सकाळी तिची प्रकृती आणखी खालावली. तिच्या यकृताला झालेली गंभीर इजा मूत्रपिंडाचे कार्यही बिघडणे, रक्तदाब कमी होणे, यामुळे शरीरातील अनेक अवयव्य एकाच वेळी बिघडत गेले. रविवारी रात्री ८ वाजता तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र उपचारादरम्यान चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बायकोने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणं मानसिक क्रूरता; हायकोर्टाची टिप्पणी, नेमकं प्रकरण काय?

Eyelash Care Tips: डोळ्यांच्या पापण्या का गळतात? पापण्यांची काळजी घेण्यासाठी करा या घरगुती सोप्या टिप्स वापरा

Period Care : मासिक पाळीच्या सारख्या तारखा बदलतायेत का? मग रेग्युलर पीरियड्ससाठी आहारात या पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: पुण्यात डेंगीचा पहिला बळी; आठ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Weather Update: वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा; 'या' ११ राज्यांना हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT