Ravindra Dhangekar News Saam Tv News
मुंबई/पुणे

Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदेंनी विश्वास दाखवला, रवींद्र धंगेकरांकडे मोठी जबाबदारी दिली; पत्र काढलं

Ravindra Dhangekar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील नेते म्हणून ओळख निर्माण करत रवींद्र धंगेकर यांची शिवसेनाच्या (शिंदे गट) पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Prashant Patil

सागर आव्हाड, साम टिव्ही

पुणे : राजकारणात सतत चर्चेत राहणारे रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतरच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की, धंगेकर यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपवली जाणार. अखेर या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील नेते म्हणून ओळख निर्माण करत रवींद्र धंगेकर यांची शिवसेनाच्या (शिंदे गट) पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

महानगर प्रमुख म्हणून काय जबाबदारी?

पुणे महानगर प्रमुखपद ही शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. महानगर प्रमुखाच्या अंतर्गत दोन ते तीन शहर प्रमुख असतील आणि संपूर्ण पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, प्रचार, निवडणूक तयारी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व घडवण्याची जबाबदारी या पदावर असलेल्या व्यक्तीवर असेल. धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून भाजपचा बालेकिल्ला फोडणारे एकमेव नेते ठरले होते. त्यांच्या या विजयामुळेच त्यांना शिंदे गटाकडून महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती.

पक्षातील रणनीतीचे नवे समीकरण

या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाने पुण्यात आपली ताकद वाढवण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. रवींद्र धंगेकर यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष आगामी महापालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये घेणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहर संघटना नव्याने सज्ज होणार असून, पक्षाला पुन्हा एकदा पुण्यात मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. राजकीयदृष्ट्या ही नियुक्ती धंगेकर यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा असून, येत्या काळात त्यांच्या कार्यपद्धतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Talking in Sleep: झोपेत तुम्हीही बडबड करता? दुर्लक्ष करू नका, असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

SCROLL FOR NEXT