SANJAY RAUT ATTACKS BJP Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SANJAY RAUT ATTACKS BJP: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', असे संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील निशाणा साधला.

Priya More

Summary -

  • पुण्यातील रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना अटकेत

  • रेव्ह पार्टी प्रकरणी संजय राऊतांची भाजपवर जोरदार टीका

  • ‘भाजप म्हणजे रेव्ह पार्टी’ असा निशाणा संजय राऊतांनी साधला

  • गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊतांची टीका

पुण्यातील खराडी येथे रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी केली. या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरला पोलिसांनी अटक केली. या कारवाईवर प्रतिक्रिया देत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवरच जोरदार निशाणा साधला.

'भाजपच रेव्ह पार्टी आहे.', अशी टीका संजय राऊत यांनी केली. यावेळी संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली. 'गिरीश महाजनसारखा सांड मोकाट सुटला आहे. एकदिवस तो देवेंद्र फडणवीस यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही.', असं म्हणत संजय राऊत यांनी महाजनांवर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी रेव्ह पार्टी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'या सरकारच्या काळात कधी कोणाला अटक होईल? कधी कोणावर गोळीबार होईल? आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल. काहीही होऊ शकतं. पोलिस आणि पोलिसांची यंत्रणा भाजपविरोधी यांना अशा प्रकारे पकडण्यासाठी आले आहे. बाकी सरकारमध्ये काहीही काम नाही. २ दिवसांपासून खडसेसाहेब सरकारच्या विरुद्ध खास करून गिरीश महाजन यांच्याविरोधात ठामपणे बोलत आहेत. पुराव्यांसह बोलत आहेत आणि त्यानंतर पुढल्या २४ तासात ताबडतोब ही कारवाई झाली.'

एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी टाकल्या जातात. भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव्ह पार्टी. तुम्हाला माहिती आहे का नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत. त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला. पक्षात आणण्यासाठी भाजपमध्ये या आणि भाजपमध्ये येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे. सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबावर मकोका कारवाई केली जाते. पण ते भाजपात गेले तर रफाडफ झालं.'

'एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबावरती कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही. अशा प्रकारच्या कारवाईला यापुढे सामोर जावे लागेल फडणवीस यांच्या राज्यामध्ये. गिरीश महाजन नावाचा सांड आहे तो मोकाट सुटला आहे. याला जर आवरलं नाही तर एक दिवस देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मातीत गाडल्याशिवाय तो राहणार नाही. यंत्रणाचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम केले जात आहे. आम्ही यातून गेलो आहोत. आमच्याकडे ईडी, सीबीआय सगळे पाठवून झाले. खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्ही लढत आहोत आणि लढत राहू. हे जेव्हा तुमच्यावरती उठेल तेव्हा महाग पडेल.अमित साळुंखे यांचा संबंध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाशी आहे. त्याचं काय झालं? पोलीस कारवाई करणार आहेत का? आमचे ४ खासदार आणि ते १६ आमदार हनी ट्रॅपमुळे भाजपमध्ये गेले.'

पुणे रेव्ह पार्टीत कोण अटकेत?

रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर अटकेत आहेत.

संजय राऊतांनी भाजपवर काय टीका केली?

‘भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी’, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.

गिरीश महाजनबाबत काय वक्तव्य?

‘महाजन सांड आहे, तो फडणवीस यांना मातीत गाडेल’, असे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

SCROLL FOR NEXT