pune rave party eknath khadse son in law pranjal khewalkar saam tv
मुंबई/पुणे

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

Pune : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेले एकनाथ खडसेंचे जावई अडकले आहेत की त्यांना अडकवलं आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलिसांना खेलवकर यांच्या रेव्ह पार्टीविषयीची टीप मिळाल्यानंतर त्यांनी नेमका कसा ट्रॅप लावला? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय.. पोलिसांनी छापेमारीत अटक केलेल्या एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकवल्याचा संशय ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय...

खरंतर पुणे पोलिसांनी खराडीतील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता.. या छाप्यात गांजा आणि कोकेन सदृश्य पदार्थ आढळून आल्याचा दावा पोलिसांनी केला होता.. शुक्रवारीही अशाच प्रकारे पार्टी झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय... तर शुक्रवारी मिळालेल्या टीप नुसारच कारवाईला सुरुवात झाली आणि रविवारी प्रांजल खेवलकर पोलिसांच्या सापळ्यात अडकले.... मात्र ही कारवाई कशी कऱण्यात आली? पाहूयात...

25 जुलै

- क्राईम ब्रांचला रेव्ह पार्टीची टीप, मात्र कारवाईत कोकेन आढळलं नाही

26 जुलै

- पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणी पुन्हा ट्रॅप लावला जातो

26 जुलै

- 5 पुरुष आणि 2 महिला खराडीतील हॉटेलमध्ये असल्याची टीप

- खराडीतील पार्टीआधी काही जणांची कल्याणीनगरच्या पबमध्ये पार्टी

27 जुलै

- मध्यरात्री दीड वाजता पब बंद झाल्यानंतर कोंडव्यात दुसरी पार्टी

- पहाटे 3 वाजता पब बंद झाल्याने सर्वजण खराडीतील हॉटेलमध्ये दाखल

- पार्टी सुरु असताना पहाटे 5 ते 6 च्या दरम्यान पोलिसांकडून छापेमारी

- दारु, हुक्का, गांजा आणि कोकेनसदृश्य पदार्थ पोलिसांकडून जप्त

या रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 5 पुरुष आणि दोन महिलांना अटक केली...मात्र ससून हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या रक्त चाचणीत प्रांजल खेवलकरांनी ड्रग्ज नाही तर दारुचं सेवन केल्याचं अहवालातून समोर आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.. दरम्यान हॅकर मनीष भंगाळेने खेवलकर यांना अडकवल्याचा आरोप केलाय...

खरंतर प्रांजल खेवलकर यांनी 25 ते 28 जुलै अशा चार दिवसांसाठी हॉटेलमध्ये फ्लॅट बूक केल्याचंही समोर आलंय... त्यामुळेच पोलिसांना मिळालेली टीप ही पार्टीत उपस्थित असलेल्या कुणी दिलीय का? याचीच चर्चा रंगलीय..दुसरीकडे हनी ट्रॅपच्या प्रकरणावरुन एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांविरोधात आरोपांची मालिकाच सुरु केली. त्याच दरम्यान खडसेंचे जावई या रेव्ह पार्टी प्रकरणी अडकल्याने कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे...त्यामुळे खडसेंचा जावई अडकला की अडकवला? हा प्रश्न निर्माण झालाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

ECGC PO Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? ECGC मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर; अर्जप्रक्रिया सुरु

Maharashtra Live News Update : मलकापूर उपजिल्हा रुग्णालयाचे "रेफर टू बुलढाणा" नामकरण

3 Idiots मधील 'मिलिमीटर' आठवतोय का? तुर्की पत्नीसोबत दिल्लीत दिसला, VIDEO होतोय व्हायरल

Radiance Hotel Delhi : स्फोटाच्या आवाजाने दिल्ली पुन्हा हादरली, महिपालपूर भागात स्फोटसदृशय आवाज

SCROLL FOR NEXT