Pune Dam Level  X
मुंबई/पुणे

Pune Dam Level : पुण्यात दिवसरात्र पाऊस, नद्या तुडूंब भरल्या; कोणत्या धरणात किती पाणी?

Pune Rain : पुण्यात मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे शहरासह अनेक तालुक्यात पावसाचा जोर वाढत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही पावसाची हजेरी झाली आहे.

Yash Shirke

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची हजेरी झाली आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील दहा-बारा दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसामुळे धरण साठ्यामध्ये किंचित वाढ झाली आहे.

पुण्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पुण्यातील सर्वच तालुक्यात पावसाची दमदार एन्ट्री झाली आहे. पुणे शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याचे समोर आले आहे.

धरण - पाणीसाठा

टेमघर - 0.24

वरसगाव - 2.70

पानशेत - 1.92

खडकवासला - 0.81

पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १४ मे पासून कमी अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पाच्या चार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणात जवळपास ५.६६ टीएमसी पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये मे महिन्याच्या शेवटी ५.८१ टीएमसी पाण्याचा साठा शिल्लक होता. महानगरपालिकेकडून शहरासाठी दररोज उचलण्यात येणारे पाणी आणि ग्रामीण भागासाठी नवीन मोठा उजवा कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात फारशी वाढ झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

SCROLL FOR NEXT