Pune Rain Update saam tv
मुंबई/पुणे

Pune Rain Update: पुण्यात येलो अलर्ट, पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Pune News : पुण्यात येलो अलर्ट, पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Satish Kengar

Weather News : पुण्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने पुणे आणि परिसरासाठी पुढील तीन दिवस येलो अलर्ट दिला आहे.

पुणे आणि परिसरात गुरुवारी पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली होती. दिवसा ऊन तर दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण अशी अनुभूती पुणेकरांना झाली.

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर ही परिणाम होताना दिसून येत आहे. यातच शुक्रवारी शहरात ३५.५ अंश सेल्सिअस कमाल आणि २१.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.  (Latest Marathi News)

कर्नाटकात चक्राकार वाऱ्यांची स्थिती

हवामानाची स्थिती पाहता उत्तर कर्नाटक व परिसरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात तुरळक भागात पावसाची शक्यता कायम आहे. तर शहर आणि परिसरात रविवारपर्यंत दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Marathwada Vidyapeeth Rain Alert : मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व पावसाची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

या प्रणालीमुळे रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत त्याची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Control: ३ महिन्यांत कोलेस्ट्रॉल होईल कमी, घरच्या घरी बनवा हे ५ जबरदस्त ड्रिंक्स

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये भाजपला धक्का; संगीता गायकवाड यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

Lakshmi Niwas: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नवा ट्विस्ट; जयंत लक्ष्मीसमोर कबूल करणार का जान्हवी सोडून गेल्याचं सत्य?

Shocking News : दिवाळीत दु:खाचा डोंगर, ४ वर्षाच्या लेकीच्या मृत्यूने आईने टाहो फोडला, जालन्यात मोकाट कुत्र्यांचा हैदोस

भाजपाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांचे निधन

SCROLL FOR NEXT