Pune Rain News water entered Dagdusheth Ganpati temple  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात तुफान पाऊस; श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरात शिरले पाणी, पाहा VIDEO

पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडुशेठ हलवाई मंदिरातही पावसाचं पाणी शिरलं आहे.

Satish Daud

Pune Rain News : गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुणे शहराला चांगलंच (Pune Rain) झोडपून काढलं आहे. सोमवारी रात्री ९ वाजेपासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी शिरलं असून रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडुशेठ हलवाई मंदिरातही पावसाचं पाणी शिरलं आहे. मंदिरात शिरलेलं पाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. (Pune Rain News)

पुण्यात मागील ३ तासांपासून तुफान पाऊस (Rain) कोसळत आहे. शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर परिसरात पावसाच्या (Rain) जोरदार सरी कोसळत आहेत. अचानक पावसाला सुरूवात झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली.

हडपसर भागात ६१ मीमी, वडगावशेरी ५८ यासह शहरातील अनेक ठिकाणी ४० ते ५० मीमी इतका पाऊस पडला आहे. पावसाचे पाणी रस्त्यांवर आल्याने वाहतूक कोडींही मोठ्या प्रमाणवर पाहायला मिळत आहे. पण वाहतूक पोलिस मात्र कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूकीवर मोठा ताण आल्याचं चित्र आहे.

दगडुशेठ गणपती मंदिरात शिरलं पाणी

३ तासांपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे पुण्यातील प्रसिद्ध गणपती दगडुशेठ हलवाई मंदिरात पाणी शिरलं आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. याव्यतिरिक्त श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयात देखील पाणी लागलं आहे.

पुण्यात पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पुण्यासह राज्याच्या दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुण्यात 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT