Pune Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Rain: पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, कुठे सर्वाधिक पाऊस पडला? हवामान विभागाकडून आकडेवारी जारी

Pune Rain Alert: पुण्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे दौंड, बारामती आणि इंदापूरमध्ये मोठे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कुठे पडला याची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

Priya More

पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. पुणे जिल्ह्यातल्या बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावाला पूराच्या पाण्याने वेढा घातला आहे, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे, शेतात पाणी साचले, घरांना- इमारतींना तडे गेले आहेत. पुणे जिल्ह्यातला पाऊस लक्षात घेता एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. पूरात अडकलेल्या गावकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस नेमका कुठे जाता याची माहिती समोर आली आहे. हवामान खात्याने आकडेवारी जारी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पनदरेमध्ये झाली आहे. पनदरे मध्ये १०४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ दौंड तालुक्यात ९८ मिलिमीटर इतका पाऊस झाला. दौंड नंतर लोणावळ्यात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाला बारामती आणि इंदापूरमधील पावसाचा अहवाल सादर केला. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झालेल्या पावसाची आकडेवारी अहवालातून सादर करण्यात आली. बारामती आणि इंदापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात ८३.६ मिमी पाऊस तर इंदापूर मध्ये ३५.७ मिमी पाऊस झाला.

पुणे जिल्ह्यात कुठे किती पावसाची नोंद -

पनदरे: १०४ मिमी

दौंड: ९८ मिमी

लोणावळा: ७६ मिमी

बारामती: ४९.५ मिमी

ढमढेरे: ३५.५ मिमी

वडगाव शेरी: ३४ मिमी

निमगिरी: २८ मिमी

माळीण: २७ मिमी

हडपसर: २५ मिमी

बारामतीमधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी -

बारामती: ७७ मिमी

माळेगाव: ८२.८ मिमी

पनदरे: १०४.८ मिमी

वडगाव: ९६.३ मिमी

लोणी: ८६ मिमी

सुपा: ७६ मिमी

मोरगाव: ७५.५

उडवडी: ८५.३

शिर्सुफळ: ७४.३

इंदापूरमधील मंडल निहाय पावसाची आकडेवारी -

भिगवण: ६३.३ मिमी

इंदापूर: २३.५ मिमी

लोणी भापकर: ४८.३ मिमी

बावडा: २३ मिमी

काटी: २६.५ मिमी

निमगाव केतकी: १८ मिमी

अंथुरने: ४४ मिमी

पळसदेव: ४८.३ मिमी

लाखेवाडी: २६.५ मिमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

SCROLL FOR NEXT